For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुरातन कागदपत्रांचा खजिना सांभाळण्यासाठी सरकार दक्ष

06:08 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
पुरातन कागदपत्रांचा खजिना सांभाळण्यासाठी सरकार दक्ष
Advertisement

पुराभिलेख व पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांचे प्रतिपादन

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

पुरातत्त्व खात्याकडे सुमारे 500 वर्षांपासूनची तीन कोटी पुरातन कागदपत्रे आहेत. यापुढे फेरफारीचे प्रकार घडू नयेत, हा पुरातन खजिना कोणी लुटू नये आणि तो खराब होऊ नये, यासाठी सरकार दक्ष असून या कागदपत्रांवर यापुढे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. तसेच या कागदपत्रांच्या डिजिटलायझेशनची प्रक्रियाही गतिमान करण्याचे प्रयत्न केले जातील, अशी माहिती पुरातत्त्व आणि पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल शुक्रवारी दिली.

Advertisement

शुक्रवारी पुरातत्त्व खात्याचे पणजीतून कदंब पठारावरील आल्कॉन इमारतीत स्थलांतरण करण्यात आले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमात मंत्री फळदेसाई बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पुरातत्व खात्याचे संचालक रोहीत कदम व पुरातत्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याचे प्रकार होऊ नयेत यासाठी नव्या इमारतीत स्थलांतरीत झालेल्या कार्यालयात ही कागदपत्रे चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली असतील. याशिवाय तेथे अग्निशामक दलाच्या वाहनाचीही व्यवस्था करण्यात येईल, असेही मंत्री म्हणाले.

पुरातत्त्व खात्याजवळील ऐतिहासिक कागदपत्रांचा भावी पिढीला मोठा लाभ मिळणार आहे. आजही अनेक इतिहास अभ्यासक, संशोधक या कागदपत्रांच्या आधारे संशोधन करीत आहेत. गेल्या काही वर्षांत पणजीत पावसाळ्याच्या दिवसांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती. पुढील काळात पणजीत पूर येऊन कागदपत्रांना कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी पुरातत्त्व खात्याचे कार्यालय सुरक्षितस्थळी आणण्याचे नियोजन सरकारने केलेले होते, म्हणून आता हे कार्यालय याठिकाणी आले आहे. पुरातत्त्व खात्याला आल्तिनो-पणजी येथे स्वतंत्र जागा मिळावी. तेथे खात्याची स्वत:ची इमारत उभी रहावी, असा प्रस्तावही आपण सरकारला सादर केलेला आहे. त्यावर लवकरच विचार होईल. या कागदपत्रांच्या डिजिटलायझेशनच्या कामाला गती देऊन ती ई-स्वऊपात जनतेला उपलब्ध करून देण्याचाही आपला विचार असल्याचेही मंत्री फळदेसाई यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :

.