For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतात असूनही भारताचे नाही मंदिर

06:17 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतात असूनही भारताचे नाही मंदिर
Advertisement

नेपाळ सरकारकडे नियंत्रण, छोटा खजुराहो अशी उपमा

Advertisement

भारतात असलेल्या सर्व गोष्टींवर सरकारचे नियंत्रण आहे, भले मग ती जागा असो किंवा एखादे मंदिर. तेथील नियम भारताच्या घटनेनुरुप तयार केले जातात. परंतु वाराणसी येथे एक असे मंदिर आहे ज्यावर नेपाळ सरकारचा अधिकार आहे. येथील नियम, दुरुस्तीचे सर्व अधिकार भारत सरकारकडे नाही तर नेपाळ सरकारच्या अधीन आहेत. वाराणसीच्या ललिता घाटानजीक नेपाळी मंदिर आहे.

वाराणसीत तुम्हला एकाहून एक सरस मंदिर आढळून येतात. गंगा घाटाच्या काठावर भगवानाच्या भक्तीत लीन होण्याचा आनंद काही औरच आहे. परंतु मंदिरांच्या या साखळीदरम्यान एक असे मंदिर आहे, ज्यावर भारताचे नियंत्रण नाही. हे मंदिर भारताच्या भूमीवर असूनही नेपाळ सरकारची मालमत्ता आहे.

Advertisement

शिवनगरी काशीमध्ये ललिता घाटानजीक नेपाळी मंदिर निर्माण करण्यात आले आहे. भगवान पशुपतिनाथाचे हे मंदिर नेपाळींच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे. या मंदिराला पाहताच तुम्हाला नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिराची आठवण होते. हे मंदिर हुबेहुब त्या मंदिराची प्रतिकृती आहे.

भारतात निर्माण या पशुपतिनाथ मंदिराला गंगा काठावर निर्माण करण्यात आले आहे. या सुंदर मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी भारत सरकारची नाही. याच्या देखभालीची जबाबदारी नेपाळ सरकारची आहे. याच्यामागे एक मोठी कहाणी असून ती शेकडो वर्षे जुनी आहे.

या मंदिराची उभारणी नेपाळचे राजा राणा बहादुर साहा यांनी करविली होती. राजा साहा 1800-1804 दरम्यान काशीमध्ये वास्तव्यास होते. यादरम्यान त्यांनी येथे एक मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु 1806 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर या मंदिर उभारणीचे कार्य थांबले होते. नंतर त्यांचे पुत्र राजा राजेंद्र वीर यांनी या मंदिराचे कार्य पुन्हा सुरू करविले होते. स्वत:च्या पित्याप्रमाणेच त्यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी सर्व सामग्री नेपाळमधून मागविली होती. या मंदिरातील शिल्प आणि वास्तुकला नेपाळमधील मंदिरानुसार करविण्यात आली आहे. 40 वर्षांनी या मंदिराची उभारणी पूर्ण झाली हीत. नेपाळच्या राजाकडून निर्मित असल्याने आजही या मंदिराच्या देखभालीची जबाबदारी नेपाळकडे आहे.

या मंदिराची उभारणी नेपाळच्या कारागिरांनी केली होती. यात वापरण्यात आलेले लाकूड देखील नेपाळमधील आहे. लाकडांमध्ये उत्तम नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराचा प्रत्येक हिस्सा याच लाकडाद्वारे तयार करण्यात आला आहे. ज्याप्रकारे नेपाळच्या मंदिरात मोठी घंटा असते, तसेच या मंदिरात देखील दिसून येते.

Advertisement
Tags :

.