‘गोकुळ’चा कारभार पारदर्शी व सभासदाच्या हिताचा...त्यामुळेच गोकुळला चाचणी लेखापरीक्षणात क्लीनचीट- अरुण डोंगळे
कोल्हापूर प्रतिनिधी
सत्तातरानंतर गोकुळच्या प्रगतीची चौफेर घौडदौड सुरु असून काटकसरीचा कारभार व कामकाजाचे सूक्ष्म नियोजन यामुळे संघाच्या दैनंदिन दूध संकलनात गतवर्षीच्या तुलनेत अडीच लाखाने वाढ झाली आहे तर गाय व म्हैस दूध खरेदी पोटी गोकुळकडून दूध उत्पादकांना राज्यात उच्चांकी दूध दर दिला जात आहे. संघाचा कारभार पारदर्शी व सभासदाभिमुख असल्यानेच चाचणी लेखापरीक्षण मधून काहीही निष्पन्न झाले नाही त्यामुळेच गोकुळ दूध संघाला क्लीनचीट दिलेली आहे. तसेच याबाबतीत मा.उच्च न्यायालयाने गोकुळच्या कारभारावर कोणत्याही प्रकारचे ताशेरे ओढलेले नाहीत. गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण कोणामुळे सुरू झाले हे सर्वांना माहीत आहे. तक्रार करणाऱ्यांनीच गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त झाले असते म्हणून मीच गोकुळ वरील कारवाई थांबवली असे म्हणणे हे पूर्णतःचुकीचे असून अशा पद्धतीचे वक्तव्य करून सभासदांची दिशाभूल करू नये असे आवाहन गोकुळचे
महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना वाहतूक भाडेवाढ कारवाई बाबत...
गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यामध्ये पशुखाद्य वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतूक भाडेवाढ प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरु असून प्रथमदर्शनी जे दोषी आढळले त्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदारीनुसार बदल्या केल्या आहेत तसेच नुकसान भरपाईची रक्कम संबंधित संस्थाकडून वसूल करण्यात आली आहे. अंतिम चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर जे कर्मचारी किंवा ज्या वाहतूक संस्था दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून नुकसानीची रक्कम वसुल केली जाईल.
औषध खरेदी – निनावी पत्राबाबत
गोकुळच्या पशुसंवर्धन विभागाकडील औषधांची खरेदी ही एन.डी.डी.बी.ने दिलेल्या निर्देशनानुसार वर्तमानपत्रामध्ये टेंडर प्रसिद्ध करून केली जाते. यासाठी कार्यकारी संचालक यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. प्राप्त दर पत्रकामधून उच्च गुणवत्तेची औषधे समितीमध्ये सविस्तर चर्चा होऊन खरेदी केली जातात. या औषधावर शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण असते ही प्रक्रिया वर्षानुवर्षे संघ नियमानुसार अत्यंत पारदर्शीपणाने केली जाते. निनावी पत्राबाबत प्राथमिक माहिती घेतली असता पत्रामध्ये उल्लेख केलेले पशुवैद्यकीय अधिकारी यांनी नुकताच १ एप्रिल २०२४ रोजी पशुसंवर्धन विभागप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या बाबतीत लिहिलेल्या मजकुरामध्ये काहीही तथ्य नसून हे व्यक्तिगत द्वेषातून तसेच गोकुळच्या बदनामीच्या विशिष्ट हेतूने हे पत्र पाठविण्यात आल्याचे दिसून येते. भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही निनावी पत्राची दखल गोकुळ प्रशासनाकडून घेतली जाणार नाही तथापि, काही सूचना अथवा तक्रारी संदर्भासह नावानिशी आली असता त्याबाबत योग्य ती कार्यवाही करणेस सोपे जाईल. पशुवैद्यकीय औषधे व पशुखाद्य उत्पादनासाठी कच्चा माल यांची खरेदी ही कार्यकारी संचालकांच्या नियंत्रणाखाली समितीमार्फत मुख्यालयातून केली जाते. याबाबत कोणीही दूध उत्पादकांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण करू नये.
संघामार्फत राबविलेल्या सभासदहिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री मान.नाम. हसन मुश्रीफसो, मान.आम. सतेज पाटीलसो व आघाडीचे सर्व नेते यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व सर्व सहकारी संचालक यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याने तसेच दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, कर्मचारी यांच्या योगदानाने ‘गोकुळ’ ची दिमाखात वाटचाल सुरु आहे.