येशू ख्रिस्तांच्या जन्माची सुवार्ता
ख्रिस्ती युवाशक्ती व ख्रिस्ती बांधवांतर्फे आयोजन
कोल्हापूर
येत्या 25 डिसेंबरला प्रभू येशू ख्रिस्त हे मनुष्याच्या तारणासाठी पृथ्वीतलावर जन्मले याची शुभवार्ता देणारी सुवार्ता फेरी शुक्रवारी दसरा चौकातून काढण्यात आली. ख्रिस्ती बांधव ख्रिस्ती युवाशक्तीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या फेरीत पाचशेहून अधिक लहान मुले, तरुण-तरुणी व ज्येष्ठ मंडळी सहभागी झाले होते. शहरातील विविध मार्गांवरून निघालेल्या फेरीमध्ये प्रभू येशूंनी माणवाला दिलेल्या शिवकणीचे फलक अनेकांनी हाती घेतले होते. तसेच सर्वांनी एक दिलाने ख्रिसमस व नुतन वर्षाच्या शुभेच्छांवर आधारीत घोषणा दिल्या.
युवाशक्तीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते सुवार्ता फेरीचा प्रारंभ दसरा चौकात करण्यात आला. यावेळी ख्रिस्ती युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष राकेश सावंत, राज्य उपाध्यक्ष संजय बेनाडी, सदस्य रामचंद्र केंगार, शहराध्यक्ष शमुवेल परब, पर्सेस ढेरे, रोहिणी सांवत, येलिया माने आदी उपस्थित होते. दोन तास सुऊ राहिलेल्या या फेरीत प्रभू येशूच्या जन्मावर आधारीत तयार केलेल्या सजिव देखाव्यासह हलगी, लेझीम पथक दाखल करण्यात आले होते. फेरीने घोषणाबाजी करत बिंदू चौकाकडे प्रयाण केले. येथून ही फेरी मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महाराणा प्रताप चौक, लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, टायटन शोऊम आदी मार्गावऊन फिरून पुन्हा दसरा चौकात आली. येथेच फेरीची सांगता केली. फेरी मार्गातून ये-जा करणाऱ्या अनेकांना ख्रिस्ती युवाशक्तीकडून चॉकलेट व नवा करार या पुस्तकाचे वाटप केले. तसेच ख्रिसमस सणात सर्व धर्मियांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन केले.