कुंभारीच्या गेनसिद्ध मंदिरावर कळसारोहणाचा सुवर्णयोग
दक्षिण सोलापूर :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामदैवत गेनसिद्ध मंदिरावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत कळसारोहणाचा सुवर्णयोग साधून कुंभारीकरांनी ऐतिहासिक कार्यक्रम करून विक्रम केला आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील गेनसिद्ध मंदिरावर मंदिराचे पुजारी गदगी पुजारी ( मुख्य पुजारी ) यांच्या हस्ते कळसारण करून भाविकांसमोर साक्षात्कार घडवून आणला. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, मराठवाडा विदर्भातून आलेल्या लाखो भाविकांनी जनसागर लोटला होता.
11:45 च्या सुमारास मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी भाविकांनी हात उंचावून गेनसिद्ध महाराज की जय च्या जयघोषात परिसर दुमदून गेला होता. यानंतर भाविकांनी अगदी शांतपणे रांगेत उभारून
महाप्रसादाचा लाभ घेतला. जमलेल्या नागरिकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विविध ठिकाणी आलेल्या भाविकांसह गावकऱ्यांनी चार दिवसापासून सुरू असलेल्या महाभोजनाचा मनसोक्त आस्वाद घेऊन आनंद द्विगुणीत केला.
- मंदिर समिती व पंच कमिटीचा उत्कृष्ट नियोजन
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामदैवत तीन गेनसिद्ध महाराजांच्या सुवर्णलेप कळसारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रम आयोजित करून निर्विघ्नपणे व शांततेच कार्यक्रम पार पडण्यासाठी गावकऱ्यांसह मंदिर समिती व पंच कमिटीचा उत्कृष्ट नियोजन केले होते.
- गेनसिद्ध लीलासार पुस्तकाचे प्रकाशन
शुक्रवारी भाकणूक कार्यक्रम झाला. श्री गेनसिद्ध मंदिरावर सुवर्णलेप कळसारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर होऊन गेनसिद्ध महाराजांच्या जीवनावर आधारित गेनसिद्ध लीलासार पुस्तकाचे प्रकाशन मंदिराचे पुजारी, मान्यवर व भक्तगणांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.
- सत्य सिद्धटगी साधू अमोगसिध्द यांच्या 51 वंशाजच्या पालखी भेटीचा कार्यक्रम
पालखी भेटीच्या या सोहळ्यासाठी कुंभारी श्री गेनसिध्द देवासह मकणापूर श्री गुरू सोमलिंग, जालगेरी श्री अमोगसिध्द, विटे श्री महासिद, तापसी श्री करणी मलकारसिध्द, अथणी श्री मळगालसिध्द, बड़ची श्री नागप्णवहीया, मरबद मंद्रूप श्री भंडी मलकारसिध्द, श्री योगीवडीया, बबलाद श्री चिक्कलगी श्री अमोगसिध्द, कॉत्यव्वादेवी, इंदापूर भावडी सुसलाद श्री मुत्यप्पवडीया, श्री बिळोगसिद, कोन्नमोळे श्री ओगसिग्द, आचेगाव श्री शिलीसिध्द, तिकुंडी श्री मुत्यप्पा बडीया, हतुर श्री ओग्यण्णामुत्या, कोलगुडू श्री करी ओगसिष्द, कुंचनूर श्री मादण्णा, इंगळगी श्री इरसिध्द, बेबनूर श्री अमोगसिध्द, गुणदाळ श्री सौभाग्यसिध्द, जकनूर श्री ओगसिध्द, विदरी श्री महीमल्लप्पा वडीया, केपवाड श्री हिरी मलकारसिध्द, निंबाळ श्री करणीसिध्द, देवर नावदगी श्री नागसिध्द, अज्जनगी श्री सिध्दाय मुत्या, कंबोगी श्री अमण्णवडीया, हुक्कुंडी श्री सिध्दरामा, जंगलगी श्री अमोगसिध्द, सातलगाव श्री मलकारसिध्द, हालचिंचोळी श्री अमोगसिध्द, सोरेगाव श्री मलकारसिध्द, सातखेड श्री अमरगोंडा, जिगजेणी श्री प्ठीसिध्द, मद्रे श्री मुत्यप्पा वडीया, सलगर श्री मदप्पयडीया, बोऱ्याळ श्री पिंडवडीया, सिध्दापूर श्री ओगसिध्द, मंदूप श्री मळगालसिध्द आदी देवांच्या पालख्या सहभागी झाल्या होत्या.
- गावकरी व भाविकांचे योगदान महत्त्वाचे
गेल्या चार दिवसापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील गेनसिद्ध मंदिराच्या कळसारहोण कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले असून यानिमित्त गावकऱ्यांचे भाविकांचे मनापासून सेवा घडत आहे. यामुळेच ही यात्रा निर्विघ्नपणे व शांततेत पार पडले. तसेच पोलीस प्रशासनाचे देखील या निमित्ताने सहकार्य मोलाचे ठरले. कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांतता व भक्तिमय वातावरणात यात्रा उसाने पार पडत आहे.
गेनसिद्ध गुंडे- पुजारी अध्यक्ष , श्री गेनसिद्ध मंदिर समिती, कुंभारी