सायबर माफियांचा गोल्डन ट्रँगल अड्डा!
दहशतवादी कारवाया असो की एखाद्याचे आयुष्य उधळून लावायचे असो यामध्ये सिमकार्डची महत्त्वाची भूमिका गणली जाते. नेमकी हीच कडी आंतरराष्ट्रीय सायबर माफियांनी हेरली आहे. बनावट सिमकार्डच्या माध्यमातून त्यांनी सामान्य नागरिकापासून ते उच्चशिक्षिताना तडे देण्यास सुऊवात केली असून, त्यासाठी त्यांनी गोल्डन ट्रँगलला आपला अड्डा बनविला आहे.
अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धामुळे जगात हडकंप माजला आहे. अनेक देशात गॅसचा तुटवडा भासू लागलाय तर तेलाचे साठे कमी होऊ लागले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर तेलाचे दर गगनाला भिडतील. एवढेच नाही तर दिवसाला मर्यादीतच तेल वापरावे लागण्याची सक्तीदेखील होण्याची शक्यता आहे. हे युद्ध आर्टिफीशीयल इंटेलिजन्स आणि सायबर तंत्रज्ञानाचा वापर करीत खेळले जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने किती फायदेशीर आणि किती नुकसानदेही प्रगती केली आहे, हे या युद्धावऊन स्पष्ट होत आहे. या युद्धामुळे अनेक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊन जगात महागाई केव्हाही डोके वर काढू शकते. याची कल्पना आलेल्या सायबर तस्करांनी सामान्य नागरिकापासून ते उच्च शिक्षितांना टार्गेट करीत त्यांना लुटण्याचा सपाटा सुऊ केला आहे. यासाठी सायबर तस्करांनी त्यांचा नवीन अ•ा बनविला आहे.
दक्षिण आशियाई देशातील गोल्डन ट्रँगल येथे. गोल्डन ट्रँगल म्हणजे काय हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. गोल्डन ट्रँगल हे ठिकाण असून ते दक्षिण आशियातील ईशान्य म्यानमार, उत्तर थायलंड आणि उत्तर लाओसच्या मध्यभागी आहे. म्हणजे तीन देशांच्या सीमावर्ती भागात असलेल्या या ठिकाणाला गोल्डन ट्रँगल असे संबोधले जाते. सायबर माफियांनी यालाच आपला अ•ा घोषीत केला आहे.
तीन देशांच्या सीमावर्ती भागात असल्याने एकतर येथे कोणत्या देशाचे लष्कर कारवाई करणार? कोणती पोलीसी कारवाई होणार? हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याचा फायदा सायबर माफियांनी उचलण्यास सुऊवात केली आहे. तसेच येथे राहून त्यांनी देशातील प्रत्येक राज्य आणि शहरात त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांची फौज गोळा केली आहे. त्यांना एकच काम देण्यात आले आहे, ते म्हणजे राज्यातील प्रत्येक शहरात राहणाऱ्या नागरिकांची आधार कार्ड मिळवून त्यांच्या नावाने बनावट सिमकार्ड पोहच करण्याची. याकरीता सायबर माफियामधल्या दलालांना हजारो ऊपये देत आहेत. मात्र या सर्वांचा पर्दाफाश चिमाजी आढाव यांच्या पथकाने केल्याने धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
तत्पूर्वी या सायबर माफियांनी कित्येकाना गंडा घातला याची गणतीच नाही. एकीकडे आयुष्यभराची कमाई काही सेकंदात गायब झाल्याने, अनेक जेष्ठ नागरिक मानसिक धक्यात आहेत. तर उच्च]िशक्षित देखील याला बळी पडले आहेत. सिमकार्ड घेण्यासाठी आलेल्या गरजू नागरिकांच्या आधार कार्ड्सचा आणि बायोमेट्रिक माहितीचा गैरवापर करून हे बनावट सिमकार्ड्स सक्रिय केले जात आहेत. नागरिकांच्या नावावर सिम कार्डस सुरू करून परदेशातून कार्यरत असलेल्या सायबर माफियांना ती पुरविली जात आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सुलतान अन्सारीला अटक केल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय सायबर माफियांना शेकडो सिमकार्ड्सचा पुरवठा केल्याची कबुली दिली. झाले असे की मुंबईतील वरळी परिसर आणि त्याच्या आसपासच्या भागात सक्रिय असलेले अनेक मोबाइल क्रमांक अचानक मोठ्या प्रमाणावर ‘आंतरराष्ट्रीय रोमिंग’ साठी वापरले जात असल्याची माहिती समोर आली होती.
प्राथमिक तपासात असे समोर आले की, या क्रमांकांचा वापर सायबर फसवणुकीशी संबंधित गुह्यांमध्ये केला जात होता. त्यामुळे या माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी सापळा रचला आणि सुलतान अन्सारीला अटक केली. चौकशीदरम्यान सुलतानने खुलासा केला की, त्याच्याकडे सिमकार्ड खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांपैकी बहुतांश लोक हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मजूर होते. ज्यांच्याकडे मुंबईतील वास्तव्याचा कोणताही वैध पुरावा उपलब्ध नव्हता. याचाच फायदा घेत त्यांच्या मूळ आधार कार्ड्समधील माहिती काढून घेण्याचा सपाटा त्याने सुऊ केला. त्यानंतर संगणकाचा वापर करून त्यांच्या माहितीमध्ये डिजिटल फेरफार करत मजुरांच्या मूळ पत्त्याच्या जागी मुंबईतीलच एखाद्या भागाचा बनावट पत्ता टाकत सहजपणे सिम कार्ड्स सुरू केले जात होते.
एखादा व्यक्ती केवळ एकच सिम कार्ड खरेदी करण्यासाठी यायचा तेव्हा आरोपी सुलतान त्या मजुराच्या बायोमेट्रिक अंगठ्याच्या ठशाचा वापर करून दूरसंचार कंपनीच्या पोर्टलवर एकाऐवजी दोन सिम कार्ड्स सुरू करत होता आणि मजुराला फक्त एकच सिम कार्ड देऊन दुसरे सिम कार्ड तो स्वत:कडे ठेवत होता. त्यामुळे आपल्या नावावर आणखी एक अतिरिक्त मोबाइल क्रमांक सक्रिय करण्यात आला आहे, याची बहुतांश नागरिकांना पुसटशीही कल्पनाही नसायची. सुलतानने याच पद्धतीचा वापर करून 100 हून अधिक दोन सिम कार्ड सुरू केले होते. त्यानंतर तो अतिरिक्त सिम कार्ड्स त्याचा साथीदार झिशान कामले याच्याकडे सोपवत होता. झिशान त्याला प्रत्येक सिम कार्डसाठी 500 ऊपये देत होता. हे सिम कार्ड्स ‘झिशान’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सायबर माफियांपर्यंत पोहोचविले जात होते. सायबर माफियांनी भारतीय क्रमांकांचा वापर करून व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर अकाउंट सुरू केले होते. ज्यामुळे लोकांना असा विश्वास वाटला की, संपर्क साधणारी व्यक्ती प्रत्यक्षपणे भारतातच उपस्थित आहे.
याच क्रमांकांचा वापर करून आरोपींनी लोकांना विविध गुंतवणूक योजना, ऑनलाइन कामे आणि इतर आमिषे दाखवून कोट्यावधी ऊपयांची फसवणूक केली. या प्रकरणामुळे मोबाइल सेवा पुरवठादारांच्या पडताळणी यंत्रणांबाबतही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. विशेषत: एखाद्या स्थानिक एजंटला बनावट पत्त्यांचा वापर करून इतक्या मोठ्या प्रमाणावर सिम कार्ड्स सक्रिय करणे कसे शक्य झाले? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलीस सध्या आरोपी सुलतानचा साथीदार असलेल्या झिशान कामलेचा शोध घेत आहेत. मात्र यामध्ये मोबाईल सेवा पुरवठादारांचादेखील समावेश आहे का? हे पाहणे आवश्यक आहे. कारण आज एका सिमकार्डमुळे कित्येकांची घरे जमीनदोस्त होत आहेत. एवढेच नाही तर 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईत झालेल्या महाभयंकर दहशतवादी हल्यातील दहशतवादी असलेल्या अबु जुंदलने देखील बनावट सिमकार्डचा वापर केला होता. त्याने 13 जुलै 2011 साली झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांनीदेखील बनावट सिमकार्डचा वापर केल्याचे तपासा दरम्यान स्पष्ट झाले होते. एका सिमकार्डमुळे नेमके काय होते? ही ताजी उदाहरणे असून, 25 वर्षे उलटले गेले तरी बनावट सिमकार्डमुळे गुन्हेगारी पेंवा दहशतवादी कारावाया थांबल्या नाहीत. याउलट भविष्यातील गुह्यांच्या नांदीचे कारण बनावट सिमकार्ड असणार हे मात्र नक्की.
अमोल राऊत