For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावला मेट्रो सिटी बनविण्याचे ध्येय!

11:38 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावला मेट्रो सिटी बनविण्याचे ध्येय
Advertisement

भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांचे मनोगत : विकासासाठी मोठ्या संख्येने विजयी करा

Advertisement

बेळगाव : संसदेत जाण्याची संधी दिल्यास बेळगावला मेट्रो सिटी बनविण्याचे ध्येय आहे. बेळगावचा विकास यापूर्वीही झाला असून, वेळोवेळी ज्या ज्या जबाबदाऱ्या माझ्याकडे होत्या, त्यातून बेळगावच्या वाट्याला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला आहे. बेंगळूरसोबत बेळगावला राज्याचे केंद्रस्थान बनविण्यासाठी बेळगावच्या नागरिकांनी मला साथ द्यावी, अशी मागणी भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सभेच्यावेळी केली. गुरुवारी रात्री बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागात जगदीश शेट्टर यांनी कॉर्नर सभा घेऊन नागरिकांना आवाहन केले. शाहूनगर येथे झालेल्या सभेला मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. कै. सुरेश अंगडी यांनी बेळगावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मंगला अंगडी यांनी आपल्यापरीने अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. यापुढेही बेळगावचा विकास करण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, मंडळ अध्यक्षा विजया कोडगन्नावर, नगरसेवक श्रेयस नाकाडी, माजी उपमहापौर रेश्मा पाटील, संकल्प शेट्टर यासह इतर उपस्थित होते.

सीए-टॅक्स प्रॅक्टीशनर्सशी साधला संवाद

Advertisement

जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी रात्री बेळगावमधील चार्टर्ड अकौंटंट, कंपनी सेक्रेटरी व टॅक्स प्रॅक्टीशनर्स यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणामुळे मागील दहा वर्षात देश आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. मी मोदींचा एक प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवत असून, मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन शेट्टर यांनी केले. यावेळी अनिल बेनके, एम. बी. जिरली, जितेश कब्बूर, विलास हलभावी, दीप्ती अडके, अरविंद देशपांडे यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.