महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धारबांदोडा तालुक्याचा सर्वांगिण विकास हे ध्येय

12:23 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुक्तीदिन सोहळ्यात आमदार गणेश गावकर यांचे उद्गार

Advertisement

धारबांदोडा : वीज, पाणी, रस्ते या प्राथमिक सुविधांबरोबरच अन्य साधन सुविधा जनतेला मिळणे गरजेचे आहे. मात्र त्याही पलिकडे जाऊन तालुक्यातील नागरिकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उत्कर्ष साधण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करणे हे सरकारचे ध्येय आहे. शिक्षणाचा मजबूत पाया घातल्यास अनेक गोष्टी साध्य होतील, असे उद्गार आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांनी काढले. धारबांदोडा तालुक्यातील शासकीय पातळीवरील मुक्तीदिन सोहळ्यात ते बोलत होते. धारबांदोडा तालुका प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आमदार गावकर यांच्याहस्ते तिरंगा फडकावल्यानंतर पोलीस पथकाकडून त्यांनी मानवंदना स्वीकारली. धारबांदोडा तालुका नवीन असल्याने तो बऱ्याच प्रमाणात विस्कळीत आहे. त्याची नियोजनबद्ध बांधणी करण्यासाठी थोडा वेळ लागेल. तालुक्यासाठी अत्यावश्यक साधन सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी पुढे बोलताना केले. ऐतिहासिक महत्त्व असलेला आग्वाद किल्ला पाहण्यासाठी जगभरातील हजारो पर्यटक या स्थळाला भेट देतात. मुक्तीलढ्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या किल्ल्यात कारावास भोगला. या स्थळाचे राज्य सरकारने संग्रहालयात रुपांतर केले असून पर्यटन खात्याअंतर्गत हा किल्ला येतो. मुक्तीलढ्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आग्वाद किल्ल्याला आवर्जुन भेट द्यावी असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर, मामलेदार लक्ष्मीकांत कुर्टीकर, गटविकास अधिकारी आदर्श देसाई, कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सगुण सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यात गोवा मल्टीफॅकल्टी महाविद्यालय यासह तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच अंगणवाडी विद्यार्थ्यांचा समावेश होता. जितेंद्र नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article