For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुन्या पेव्हर्सवरच नवीन पेव्हर्स बसविण्याचा प्रताप

11:01 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
जुन्या पेव्हर्सवरच नवीन पेव्हर्स बसविण्याचा प्रताप
Advertisement

आरपीडी कॉर्नर येथील प्रकार : निधीची उधळपट्टी

Advertisement

बेळगाव : नागरिकांनी कर स्वरुपात दिलेल्या पैशांची उधळपट्टी कशी केली जाते, याचे उत्तम उदाहरण सध्या टिळकवाडी येथील आरपीडी कॉर्नर येथे पाहायला मिळत आहे. जुने पेव्हर्स काही ठिकाणी निखळले असल्याने त्यावर काँक्रिट घालून पुन्हा नवीन पेव्हर्स बसवून पैसे उकळण्याचा प्रकार कंत्राटदाराकडून सुरू आहे. ती एक प्रकारची जनतेची दिशाभूल असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आरपीडी कॉर्नर ते अनगोळ कॉर्नर या दरम्यान असणाऱ्या फूटपाथवरील जुने पेव्हर्स काही ठिकाणी निखळले आहेत. ज्या ठिकाणी पेव्हर्स निखळले आहेत तेथे डागडुजी केल्यास फूटपाथ चांगल्या दर्जाचा होऊ शकतो. परंतु जादा बिलाची रक्कम वसूल करण्यासाठी कंत्राटदाराकडून जुन्या पेव्हर्सवरच काँक्रिटचा थर चढवून नवीन पेव्हर्स बसविले जात आहेत. हा नागरिकांच्या पैशांचा अपव्यय नाही का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच कंत्राटदारांचे फावले आहे. सोमवारपासून कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार असून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. असे प्रकार शहराच्या इतर भागातही होत असून एखाद्या कंत्राटदारावर कारवाई झाल्यास अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.