For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय क्रिकेटमधील वैभव

06:01 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय क्रिकेटमधील वैभव
Advertisement

आयपीएल क्रिकेट हे कसोटी क्रिकेटला बाधक आहे अशी ही मल्लिनाथी झाली होती.परंतु आपण कितीही आयपीएलच्या नावाने नाक मुरडली तरी जागतिक दर्जाचा यॉर्कर स्पेशालिस्ट बुमराह आयपीएलचीच देणगी होता काल-परवा ज्याच्या नेतृत्वात आपण टी-20 विश्वचषक जिंकला त्या सूर्यकुमार यादव यांचा सूर्योदय याच महाकुंभमेळ्यात झाला, याच मांदियाळीत एक नवीन नाव पडते ते वैभव सूर्यवंशी अजून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पहिली धाव घ्यायची आहे.

Advertisement

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हा वाक्यप्रचार भविष्यात खरा ठरेल यासाठी कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही.यावर्षीच्या आयपीएलच्या मोसमात  सुरुवातीचे काही सामने पाहिल्यानंतर आयपीएलची जादू संपली की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. भारतीय क्रिकेटच्या युवराजाची रणजी ट्रॉफी पट्टराणी होती. परंतु मागील 10-12 वर्षात तिची जागा आयपीएलने घेतली. परंतु पुन्हा एकदा आयपीएलची पट्टराणीची जागा धोक्यात येते की काय असं वाटत असतानाच राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक, कलात्मक आणि अविश्वसनीय फलंदाजीच्या जीवावर प्रेक्षकांना मैदानाकडे येण्यास भाग पाडले.  आयपीएल मध्ये पुन्हा एकदा जान आली ती म्हणजे वैभवमुळे आयपीएलच्या 2026 मोसमातून फक्त भारतातच राज्य केले नाही तर अप्रत्यक्षरीत्या भारता बाहेरील जेष्ठ क्रिकेटपटूंना त्याची दखल घेण्यास भाग पाडले. हे सर्व करत असताना त्याचे वय फक्त पंधरा वर्षे आणि दोन महिने बरं का! 2026 च्या आयपीएलचे पर्व लक्षात राहील ते वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीमुळेचं. त्याच्या फलंदाजीत अगदी सहजता आहे जी सहजता आपण मायकल जॅक्सनच्या नृत्यात बघतो, क्रिकेट मधील टॉप सीडेड बुमराह ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज पॅट कमीन्सला तर जनरल कोच मध्ये बसवलं. त्याला खेचलेले तीन षटकार तर अविश्वासनीयच होते.  जागतिक क्रिकेटमधील बिग बॉस समजल्या जाणाऱ्या सर्वच गोलंदाजाना त्याने एलिमेनेट केलं. आजकाल बरेच क्रिकेट विश्लेषक वैभव सूर्यवंशीची तुलना सचिन तेंडुलकर यांच्याशी करू लागलेत. यात उजवा कोण डावा कोण याचं उत्तर आपल्याला काळ निश्चितच देईल. परंतु मागील काही वर्षात वैभवने घेतलेली मेहनत हि निश्चितच फळाला येतेयं हे हि तेवढेच खर बिहारच्या समस्तीपुरचा हा खेळाडू (नेपाळची बॉर्डर) वयाच्या सातव्या आठव्या वर्षी त्याचे वडील बिहारच्या प्रमुख क्रिकेट अॅकडमी मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी वैभवला घेऊन जायचे,त्याच्या घरापासून हे अंतर तब्बल 100 किलोमीटर दूर होते. एक दिवस आड करून तो रोज प्रशिक्षणासाठी 100 किलोमीटर प्रवास करायचा. यावरून आपण त्याच्या खडतर मेहनतीचा अंदाज बांधू शकतो. गंमत बघा सचिनने रणजी पदार्पण केलं 16 वर्ष 205 व्या दिवशी तर वैभव सूर्यवंशीचं रणजी पदार्पण होतं 12 व्या वर्षी तेही बलाढ्या मुंबई विरुद्ध काही दिवसांपूर्वी अंडर-19 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम फेरीत त्याच्या शतकाच्या जीवावर भारताने विजय मिळवला होता हे विसरून चालणार नाही. प्रत्येक महत्त्वपूर्ण सामन्यात त्याची बॅट तळपते हे आपणास वारंवार दिसून आले. 2026 च्या आयपीएल पर्व हे ज्वलंत उदाहरण.भारतीय क्रिकेटमध्ये डावखुरा फलंदाज आणि षटकार म्हटलं की आठवतो तो ‘अतुल बेदाडे‘. व वैभव सूर्यवंशी हा सुद्धा त्याच पठीतला फरक एवढाच की वैभवच्या षटकारात सौंदर्य आहे.असो. आज आयपीएलचा अंतिम सामना. त्या सामन्यात वैभव सूर्यवंशी आपल्याला मैदानात दिसणार नाही हे निश्चितच न सुटणार कोड असणार ते प्रेक्षकांसाठी.

भारतीय टी-20 क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट मध्ये खेळताना बघणार आहोतच. मी स्वता कसोटी क्रिकेटचा पुजारी म्हणून झटपट क्रिकेट आणि टी-20 क्रिकेट बघणं सोडून दिलं नाहीये. फरक इतकाच की प्रत्येक फॉरमॅटमधील क्रिकेट बघताना आपण आपल्या चष्म्याचा भिंग बदलला पाहिजे. एकंदरीत काय वैभव सूर्यवंशीच्या नावाने भारतीय क्रिकेटमध्ये 2028 च्या टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय संघाने रामराज्य आणल तर आश्चर्य वाटून घेऊ नका एवढे मात्र खरं! तूर्तास तरी भारतीय क्रिकेट मधील फलंदाजीतील वैभवशाली परंपरा भविष्यात वैभव सूर्यवंशी टिकवून ठेवो एवढीच माफक अपेक्षा.

Advertisement

Advertisement
Tags :

.