For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागात परिस्थिती सध्या आव्हानात्मक

06:28 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागात परिस्थिती सध्या आव्हानात्मक
Advertisement

संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव गुट्रेस यांचे प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ

सध्या जगाची राजकीय आणि सामरीक स्थिती आव्हानात्मक आहे. लवकर या परिस्थितीवर तोडगा निघण्याची आणि ती निवळण्याची शक्यता कमी आहे. जगावर सत्ता कोणाची या एकाच तत्वातून हा वाद निर्माण झाला असून त्या वादाची भिन्न dभिन्न रुपे आज आपल्याला जागतिक संघर्षांच्या माध्यमातून दिसून येत आहेत, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अंटोनिओ गुट्रेस यांनी केले आहे.

Advertisement

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत ते शनिवारी भाषण करीत होते. त्यांचा पदावरील कालावधी संपण्यासाठी आता साधारणत: 100 दिवस उरले आहेत. हे त्यांचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेसमोरचे शेवटचे भाषण असू शकते.  या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाषणाला महत्व देण्यात येत आहे. संयुक्त राष्टसंघाची भूमिका आज कधी नव्हे, इतकी महत्वाची झाली असून ही संस्था दुर्बळ होणे जगासाठी हितकारक ठरणार नाही, अशी मांडणी त्यांनी त्यांच्या भाषणात केली.

दऱ्या रुंदावत आहेत

जगातील मतभेद आता केवळ सामान्य किंवा सौम्य राहिलेले नाहीत. मतदभेदांच्या दऱ्या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी अधिक रुंदावत आहेत. भेगांचे रुपांतर दऱ्यांमध्ये झाले आहे. जगात आज घडणाऱ्या घटनांकडे आपल्याला त्या  भिन्न आणि एकट्यादुकट्या आहेत, अशा प्रकारे पाहता येणार नाही. या घटनांचे मूळ एकच आहे. जगावर नियंत्रण कोणाचे असणार, हा मूळ प्रश्न असून तोच प्रश्न वेगवेगळ्या संघर्षांच्या अवतारात आपल्यासमोर प्रकट होत असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. सध्या जगात अनेक सामरीक संघर्ष होत असून त्यांच्यापैकी कोणत्याही संघर्षाचा अंत दृष्टीपथात नाही, अशी व्यथा त्यांनी यावेळी प्रतिनिधींसमोर मांडली.

समानता हे स्वप्न नसून निर्णय 

जगात एकाबाजूला प्रचंड संपत्तीचा झगमगाट पहायावस मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला आजही अब्जावधी लोक पोटभर अन्न, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा, यांच्या विवंचनेत आहेत. विषमता हा केवळ आर्थिक मुद्दा नसून तो संधीवर होत असलेल्या सत्तेच्या कुरघोडीचा प्रश्न बनला आहे. विकसनशील देश या विषमतेचे बळी ठरत असून ते कर्जांच्या असह्या बोजाखाली दबले गेले आहेत. तसेच, जे प्रदूषण त्यांनी घडविलेले नाही, त्या प्रदूषणाचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत, ही वस्तुस्थिती त्यांनी स्पष्ट केली.

दोन जटील आव्हाने

आपल्या भाषणात त्यांनी पर्यावरण परिवर्तन (क्लायमेट चेंज) आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) ही दोन भविष्यकालीज जगासमोरची सर्वात जटील आणि भीषण आव्हाने असतील, असे स्पष्ट करतानाच,जे विकसीत देश प्रदूषण करीत आहेत, त्यांनी विकसनशील देशांना हानीची भरपाई दिली पाहिजे. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानामुळे असंख्यांवर बेकार होण्याची वेळ येईल. तंत्रज्ञान हा धोका नाही, तर उत्तरदायित्वविहीत तंत्रज्ञान हा खरा धोका आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Advertisement
Tags :

.