नौकेत राहणारी युवती
दर महिन्याला करते 1 लाख रुपयांची बचत
जे लोक भाड्याच्या घरात राहतात, त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम भाड्यापोटी द्यावी लागत असते. अशा स्थितीत हा खर्च वाचविण्यासाठी हे लोक स्वत:चे घर खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु सद्यकाळात स्वत:चे घर खरेदी करणे सोपे नाही. इंग्लंडच्या एका युवतीलाही असेच वाटत होते. ती भाडे देत-देत त्रस्त झाली होती. अशातच्या तिच्या नजरेत एक नौका विक्रीची जाहिरात आली. मग या युवतीने नौकेतच घर वसविण्याचा निश्चय केला. आता ती दर महिन्याला एक लाख रुपयांपेक्षा अधिक बचत करत आहे.
29 वर्षीय शॅनन लेन लंडनमध्ये राहत होती. ती ज्या भागात वास्तव्यास होती, तेथे एक बेडरुम फ्लॅटचे भाडे 1.68 लाख रुपये महिन्याला होते. ती एक फ्रीलान्स प्रॉड्यूसर असून यापेक्षा स्वस्त ठिकाणी राहू इच्छित होती. तिच्याकडे पब ब्रीडचा श्वान गिलबर्ट देखील आहे. ती अशा ठिकाणाचा शोध घेत होती जेथे ती श्वानालाही सोबत ठेवू शकेल. ती केवळ एका खोलीसाठी 94 हजार रुपयांचे भाडे भरत होती.
ऑक्टोबर 2022 मध्ये किंग्स क्रॉस कालव्याच्या परिसरात हिंडत असताना तिच्या वाचनात एका नॅरोबोटच्या विक्रीची जाहिरात आली. स्वत:चे घर वसविण्याची हीच संधी असल्याचे तिला वाटले. ही नौका 30 फुटांची होती आणि यात घराशी निगडित बहुतांश साधने होती. शॅननने 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि जानेवारी 2023 मध्ये ती नौकेत स्थलांतरित झाली. नौकेत रहायला गेल्यापासून तिचे मानसिक आरोग्य सुधारले आहे. आता तिला नैराश्याच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही.
हिवाळ्यात होते अडचण
हिवाळ्यात तिला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. घराच्या आत थंडी वाढत असल्याने तिच्या श्वानासाठी ठेवलेलेही पाणी गोठून जाते. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर व्हिडिओ शेअर केला असून यात थंडीची तीव्रता दिसू येते. अशाप्रकारची स्थिती असूनही शेनन आता दर महिन्याला 1.2 लाख रुपयांची बचत करते. कारण नौकेवर राहणे, घराच्या खर्चांपेक्षा खूपच स्वस्त आहे. परंतु थंडीमुळे तिने मागील वर्षी नौकेवर राहणे पूर्णपणे सोडून देल होते. आता ती उन्हाळ्यात पुन्हा नौकेवर रहायला जाणार आहे. अनेक लोक अशाप्रकारे नौकेवर राहतात आणि त्यांच्यासोबत शेननने एक कम्युनिटी तयार केली आहे.