For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिटनमध्ये 4 जुलैला होणार सार्वत्रिक निवडणूक

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रिटनमध्ये 4 जुलैला होणार सार्वत्रिक निवडणूक
Advertisement

पंतप्रधान ऋषी सुनक यांची घोषणा : लेबर पार्टी सर्वेक्षणात आघाडीवर

Advertisement

वृत्तसंस्था /लंडन

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी राष्ट्रीय निवडणुकीची घोषणा केली आहे. 4 जुलै रोजी ब्रिटनमध्ये मतदान होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकीत सत्तारुढ कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीला 14 वर्षांच्या सत्तेनंतर विरोधी पक्ष लेबर पार्टीकडून पराभव पत्करावा लागू शकतो असे मानले जातेय. मागील 5 वर्षे देशासाठी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील सर्वात आव्हानात्मक राहिली आहेत. आगामी दिवसांमध्ये लोकांच्या प्रत्येक मतासाठी संघर्ष करणार आहे. आमच्याकडे एक ठोस योजना असल्याचा दावा पंतप्रधान सुनक यांनी केला आहे. ब्रिटनमध्ये निवडणुकीच्या कालावधीवरून अनेक महिन्यांपासून कयास वर्तविले जात होते. हे कयास संपुष्टात आणत सुनक यांनी स्वत:च्या 10 डाउनिंग स्ट्रीट या निवासस्थानाबाहेर निवडणुकीची घोषणा केली आहे. काही लोकांच्या अपेक्षेच्या तुलनेत अगोदर निवडणूक घेतली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जनमत सर्वेक्षणांमध्ये आमचा पक्ष खूपच मागे असल्याने ही एक जोखिमयुक्त रणनीति आहे. सुनक यांचा पक्ष लेबर पार्टीच्या तुलनेत खूपच मागे आहे. तसेच सुनक हे स्वत: पक्षात एकाकी पडल्याचे मानले जातेय.

Advertisement

सर्वेक्षणात पक्ष पिछाडीवर

काही आर्थिक लाभ, महागाईत घट आणि अर्थव्यवस्थेत तीन वर्षांमधील सर्वात मोठी वाढ पाहता सुनक यांनी जोखीम पत्करण्याचा आणि नव्या कार्यकाळासाठी स्वत:चा अजेंडा औपचारिक स्वरुपात मतदारांसमोर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी बँकर आणि अर्थमंत्री राहिलेल्या सुनक यांनी दोन वर्षांपेक्षा कमी काळापूर्वी पंतप्रधानपद स्वीकारले होते. तेव्हापासून ते अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्नशील होते.

प्रचाराला प्रारंभ

ब्रिटनच्या दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या निवडणुकीतील मुख्य मुद्द्यांमध्ये ब्रिटनची अर्थव्यवस्था आणि संरक्षण सामील आहे. विरोधी पक्षाचे नेते याच दोन मुद्द्यांवर सुनक सरकारची कोंडी करू पाहत आहेत. सुनक सरकारने लेबर पार्टीवर करवाढीची तयारीचा आरोप केला आहे. लेबर पार्टी सत्तेवर येणे ब्रिटनसाठी योग्य ठरणार नाही. कारण त्या पक्षाकडे योजनेचा अभाव असल्याचा दावा कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीने केला आहे.

लेबर पार्टीच्या निशाण्यावर

लेबर पार्टीने सरकारवर 14 वर्षांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आहे. आम्ही निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहोत. पंतप्रधानांनी निवडणुकीची घोषणा केली आहे. आमच्याकडे पूर्णपणे संघटित टीम आहे. देशाच्या जनतेला आम्ही योग्य पर्याय देऊ असे उद्गार लेबर पार्टीचे नेते स्टार्मर यांच्या प्रवक्त्याने काढले आहेत.

Advertisement
Tags :

.