निवळीतील अपघातानंतरच्या गॅसगळतीचा चार घरांना फटका
रत्नागिरी :
मुंबई-गोवा महामार्गावर बावनदीजवळच्या निवळी घाटात एलपी गॅस वाहतूक करणारा टँकर व मिनीबस यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातानंतर गॅस गळतीने लागलेल्या आगीत परिसरात चार घरांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत 4 घरांसह, रिक्षा, कार, मोटारसायकल व इतर साहित्याचे सुमारे 25 लाखाचे नुकसान झाले आहे.
रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात 26 प्राथमिक शिक्षक जखमी झाले. अपघातानंतर टँकरही उलटल्याने त्यातून गॅस मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. त्यामुळे परिसरातील दोन घरे, रिक्षा आणि एका झोपडीला आग लागून मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात धोकादायक स्थिती निर्माण झाल्याने पोलीस यंत्रणेने महामार्गावरील वाहतूक बंद केली होती. छोट्या गाड्या अन्य मार्गावऊन वळवल्या होत्या.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह ग्रामीण पोलीस स्थानक, महामार्ग पोलीस अधिकारी संपूर्ण दिवस व रात्र महामार्गावर तळ ठोकून उभे होते. अग्निशमन यंत्रणाही सकाळपर्यंत महामार्गावर तैनात करण्यात आली होती. या टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये भरल्यानंतर परिसर सुरक्षित झाला आणि साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
या घटनेनंतर तहसीलदार राजाराम म्हात्रे रविवारी दिवसभर घटनास्थळी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले. या घटनेमध्ये संतोष शामराम बेंडखळे यांच्या घर, साहित्य व गाड्यांचे मिळून साडेसोळा लाखांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बेंडखळे यांची मोटारसायकल व कार खाक झाली. तसेच सुधीर शामराम बेंडखळे यांचे सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. त्यांची म्हैस व वासऊ जखमी झाले आहेत. रिक्षा संपूर्ण जळून खाक झाली. तसेच घराचे व आतील साहित्याचे नुकसान झाले आहे. रवींद्र शेट्यो यांच्या घर व साहित्याचे मिळून सुमारे एक लाख 42 हजाराचे नुकसान झाले आहेत. तर लहू दिनकर साळुंखे व रेश्मा लहू साळुंखे यांचेही सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये सुमारे 25 लाखाहून अधिकचे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच त्याठिकाणी महामार्गालगत लोहारकाम करणाऱ्या साळुंखे या कुटुंबियांचेही झोपडी जळाल्याने आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
- महामार्गावरील वाहतूक 20 तासानंतर सुरळीत
निवळी बावनदी येथे झालेल्या टँकर-मिनीबस अपघातामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील निवळी मार्गे होणारी वाहतूक तब्बल 20 तासानंतर सुरळीत सुरू झाली. 8 जून रोजी सकाळी 8.25 वाजता झालेल्या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पाली-संगमेश्वरमार्गे वळविण्यात आली होत़ी यानंतर टँकर व अपघातग्रस्त वाहने रस्त्यावऊन हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र टँकरचा आकार व महामार्गाचे काम सुऊ असल्याने महामार्ग मोकळा होण्यास 20 तास लागल़े रात्री उशिरा टँकर रस्त्यावऊन बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आल़ी
- टँकर चालकाविऊद्ध गुन्हा
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी बावनदी येथे रविवारी सकाळी झालेल्या टँकर-मिनीबस मधील अपघात प्रकरणी पोलिसांनी टँकर चालकाविऊद्ध गुन्हा दाखल केल़ा राजेश महावीर यादव (ऱा चेंबुर, मुंबई) असे संशयिताचे नाव आह़े रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवला आह़े पोलिसांनीयादव याच्याविऊद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 281, 125(अ),(ब),324(4) व मोटार वाहन अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा