कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पिरनवाडी येथील कचरा समस्या बनली गंभीर

10:38 AM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कचऱ्यामुळे दुर्गंधी : वाहनधारक स्थानिकांना त्रास, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची गरज 

Advertisement

वार्ताहर/किणये 

Advertisement

प्रशासनामार्फत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. विविध ग्राम पंचायती, नगर पंचायती यांच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. पिरनवाडी येथील नाल्याजवळ, उर्दू शाळेनजीक व बेळगाव-खानापूर महामार्ग, पिरनवाडी भाजीमार्केटच्या बाजूला नेहमीच कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळतात. या केरकचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. याचा वाहनधारक व स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिरनवाडी गावातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. पिरनवाडी ग्राम पंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला आहे. अलीकडे पिरनवाडी गावचा विस्तारही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पश्चिम भागातील अनेक गावांसाठी पिरनवाडी केंद्रबिंदू ठरत आहे. यामुळे या येथे विविध प्रकारची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने आदींच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह अन्य गावांतील नागरिकांची बाजारासाठी गर्दी होऊ लागली आहे.

प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता

गावचा विस्तार वाढला, आजूबाजूच्या खेडेगावातील नागरिकांना बाजारपेठ उपलब्ध झाली, पिरनवाडी येथील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसायही बऱ्यापैकी चालू झाला. सर्व बाजूंनी विचार करता ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र पिरनवाडीत सध्या कचऱ्याची समस्या गंभीर बनू लागली आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पिरनवाडी येथील उर्दू शाळेजवळ तसेच नाल्याजवळ दुकानातील प्लास्टिक, प्लास्टिक बॉटल्स, चिकन व मटणाचे टाकाऊ पदार्थ टाकण्यात येत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे याचा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. उर्दू शाळेजवळ कचरा टाकण्यात येत असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा टाकणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे, अशी मागणी पालकवर्गातून करण्यात येत आहे. नाल्याजवळ तर मृत्यू पावलेली कुत्रीही टाकण्यात येतात. त्यामुळे या ठिकाणी अधिक प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

जनजागृती करण्याची गरज

पिरनवाडीत ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्याची आवश्यकता आहे. स्वच्छतेसंदर्भात आणि कचऱ्यासंदर्भात अजूनही या गावात जनजागृती करायला हवी. काहीजण रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत पोत्यातून व पिशवीतून कचरा आणून टाकत आहेत. कचरा टाकणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article