For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घी गल्लीतील संरक्षण भिंत टोळक्याने पाडली

10:29 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
घी गल्लीतील संरक्षण भिंत टोळक्याने पाडली
Advertisement

न्यायालय आदेशाचा अवमान : जीवे मारण्याची धमकी

Advertisement

बेळगाव : घी गल्ली येथील बांधकामाबाबत न्यायालयाने निकाल दिला होता. महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम करून दिले होते. तरी देखील रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास काही महिलांनी आणि नागरिकांनी ते कंपाऊंड पाडून शिवीगाळ केली. यावेळी पोलीस येताच साऱ्यांनी तेथून पळ काढला आहे. मात्र या प्रकारामुळे संबंधित घर मालकाचे नुकसान झाले असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. घी गल्ली येथे इंदादुल्ला जवादहैमद कादरी, फुरखान जवादहैमद कादरी यांच्या घराला संरक्षण भिंतीबाबत न्यायालयाने महानगरपालिकेला बांधून देण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार महानगरपालिकेने भिंत बांधून दिली होती. मात्र काही महिलांनी तसेच नागरिकांनी अचानक येवून रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला केला. यावेळी इंदादुल्ला व फुरखान यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.  तेव्हा महानगरपालिका तसेच पोलिसांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देवून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.