गँगस्टरच्या आड स्पाय नेटवर्कचा खेळ !
मुंबई तसेच देशांतून अंडरवर्ल्ड संपल्याचे अनेक तज्ञ दावा करत आहेत. मात्र अंडरवर्ल्ड संपले नाही तर बदलत्या काळानुसार अंडरवर्ल्डची व्याख्या बदलली आहे. एकेकाळी खुलेआम गँगवॉर, एन्काऊंटर तसेच प्रत्यक्ष हस्तकांवर चालणारे अंडरवर्ल्ड आता सोशल मीडिया, एक्रिप्टेड संपर्क, ऑनलाइन पेमेंट आणि डिजिटल ओळखींचा वापर करू लागले आहे. म्हणजेच अंडरवर्ल्ड अत्याधुनिक आणि आधुनिक झाले आहे. नेमका याचा प्रत्यय पाकिस्तानचा भुरटा गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणात येतो. एका बाजूला परदेशात बसलेला कथित गँगस्टर, दुसऱ्या बाजूला भारतातील सोशल मीडिया वापरणारे तऊण आणि मधोमध दहशतवादी किंवा गुन्हेगारी स्वरूपाची कामे. अशी ही रचना म्हणजेच गँगस्टरच्या आड स्पाय नेटवर्कचा खेळ! होय.
भारत देशाच्या पवित्र भूमीवर युगे न युगे आक्रमणे झाली आहेत. जेवढ्या ताकदीने ही आक्रमणे झाली तेवढ्याच ताकदीने या आक्रमणांचा बिमोड करण्यात आल्याचा इतिहास आहे. अखंडप्राय देशाचे तुकडे करण्यात भलेही काही परकीय यापूर्वी यशस्वी झाले असतील. मात्र आता भारत देश बदलला आहे. परकीय आक्रमण तर सोडाच वाकड्या नजरेने जरी पाहिले तरी समोरच्यांची बिशाद नाही. हे आता जगाला कळून चुकले आहे. मात्र तरी काही पाक-चीन-पुरस्कृत दहशतवादी संघटना देशाचे तुकडे करण्याची स्वप्ने पाहत आहेत. यासाठी देशातील तरूणांचे आणि समाजकंटकाचे
ब्रेनवॉश करण्याचे काम सुऊ आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जगातील अनेक देशात ‘धुरंधर’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात देशाची गुप्तचर संस्था असलेल्या रॉच्या एका एजंटने पाकिस्तानातील अंडरवर्ल्डमध्ये एण्ट्री करीत आयएसआय, लष्कर-ए-तोयबा आणि दाऊदला जोरदार धक्का दिला होता. दहशतवाद व दहशतवादी संघटना व त्यांना पोसणाऱ्या आयएसआय आणि दाऊदला मरणासन्न अवस्थेत पोहचविले होते. अशी ही कहाणी आहे. नेमके याच कहाणीच्या आधारे पाकिस्तानचा भुरटा देशात गँगस्टरच्या आधारे स्पाय नेटवर्कचा खेळ खेळत आहे.
मात्र त्याचे बऱ्यापैकी कंबरडे तपास यंत्रणांनी मोडले आहे. शहजाद भट्टी असे या भुरट्याचे नाव आहे. शहजाद भट्टीचा अंडरवर्ल्ड ते दहशतवादापर्यंतचा कथित प्रवास सोशल मीडियातून झाला आहे. मात्र देशातील तऊणांची भरती आणि मुंबई कनेक्शनने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढवली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, व्यावसायिक आणि धार्मिक वक्ता अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या भट्टीने त्याच्या कथित नेटवर्कमध्ये अंडरवर्ल्डची कार्यपद्धती, सोशल मीडिया भरती, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि ‘स्पाय’ अर्थात हेरगिरी या कामांसाठी तऊणांचा वापर करण्यास सुऊवात केल्याचे समोर आले आहे. शहजाद भट्टीची कहाणी पारंपरिक अंडरवर्ल्डपेक्षा वेगळी आहे. मुंबई किंवा कराचीच्या गल्लीबोळातून सुरू होणाऱ्या जुन्या गुन्हेगारी साम्राज्याप्रमाणे त्याचे कथित नेटवर्क प्रत्यक्ष भेटींवर अवलंबून नाही. ज्याप्रकारे लॉरेन्स बिश्नोईने सोशल मीडियाचा वापर करत देशात अनेक ठिकाणी मवाल्यांची भरती केली आहे. नेमके तेच शस्त्र भुरट्या भट्टीने वापरले आहे.
भट्टीने ‘333’ या ब्रँडिंगखाली सोशल मीडियावर मोठा प्रभाव निर्माण केला आहे. धार्मिक विषय, राष्ट्रवाद, वादग्रस्त मुद्दे आणि भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करत त्याने मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स जमवले. पुढे याच डिजिटल लोकप्रियतेचा वापर तऊणांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात आला. तरूणांचे ब्रेन वॉश करताना सुऊवातीला अत्यंत साधी कामे त्यांना देण्यात येत. एखाद्या सार्वजनिक ठिकाणाचे छायाचित्र काढणे, व्हिडीओ बनवणे किंवा विशिष्ट ठिकाणाची माहिती देणे अशा कामांपासून कथित भरतीची सुऊवात होत असे. एवढचे नाही तर मुंबई तसेच राज्यातील तरूणांना भट्टीने ‘गेमिंग मिशन’सारख्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने कामे देण्यात आल्याचे समोर आले आहे. ही पद्धत सुरक्षा यंत्रणांसाठी अधिक धोकादायक मानली जाते. कारण सुऊवातीला एखाद्या तऊणाला आपण गुन्हेगारी किंवा दहशतवादी नेटवर्कचा भाग बनत आहोत, याची काहीच कल्पना नसते. साध्या कामातून त्याची मानसिकता, विश्वासार्हता आणि आदेश पाळण्याची तयारी तपासल्यानंतर पुढील काम देण्याचा कथित प्रकार तपासात समोर आला आहे.
मुंबई अंडरवर्ल्डचा इतिहास पाहिला तर गुन्हेगारी टोळ्यांनी अनेकदा परदेशातील सुरक्षित ठिकाणांहून देशातील हस्तकांच्या माध्यमातून कारवाया केल्या आहेत. मात्र, भट्टी प्रकरणात सोशल मीडिया, बनावट ओळखी, ऑनलाइन संपर्क आणि छोट्या-छोट्या कामांमधून तऊणांची निवड करण्याची पद्धत तपास यंत्रणांसमोर संकट उभे राहिले आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी भट्टीशी संबंधित कारवाई करत शस्त्रs, दाऊगोळा आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. भट्टी प्रकरणातील सर्वात गंभीर पैलू म्हणजे कथित हेरगिरीचे स्वरूप. काही तऊणांकडून सार्वजनिक ठिकाणे, सरकारी इमारती, पोलीस ठाणी आणि संवेदनशील परिसरांची माहिती गोळा करण्यात आली आहे. अशा पद्धतीने सामान्य नागरिकाला ‘रेकी’ आणि हेरगिरीच्या कामात ओढले असल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे भट्टीचे कथित नेटवर्क केवळ गुन्हेगारी टोळी किंवा अंडरवर्ल्डचा विस्तार नाही तर त्यामागे गुप्तचर यंत्रणेच्या सहाय्याने चालणारी मोठी रचना आहे. एकटा भट्टी हे करणे शक्य नाही. कारण त्यामागे पाकिस्तानी आयएसआयचा हात आहे. भट्टीला पुढे करत आयएसआयने हा खेळ खेळण्यास सुऊवात केली आहे.
महाराष्ट्र एटीएसने भट्टीच्या संपर्कात आल्याचा संशय असलेल्या 57 जणांची चौकशी केली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यातील संशयीतांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने भट्टीच्या कथित ऑनलाइन नेटवर्कशी संपर्क असलेल्या 102 व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. यामुळे भुरटा भट्टी हा केवळ पाकिस्तानपुरता किंवा पंजाबपुरता मर्यादित नसून मुंबईतील अंडरवर्ल्डपर्यंत पोहचला आहे. याला आपसुकच आयएसआय आणि दाऊदची साथ आहे. भलेही दाऊद सध्या मरणासन्न अवस्थेत असला तरी छोटा शकीलचे काही हस्तक आजही मुंबईत सक्रीय आहेत. मात्र या हस्तकांची मदत केवळ दिशा दाखविण्यासाठी केला जात आहे. भट्टीने या हस्तकांना मुद्दामहून दूर ठेवले आहे. कारण भट्टीने भरती केलेल्या व्यक्तींचा पूर्वी कोणताही गंभीर गुन्हेगारी इतिहास नव्हता त्यांना सोशल मीडियावरून पैसे, परदेशातील संधी किंवा आकर्षक जीवनशैलीचे आमिष दाखवून जाळ्यात अडकविल्याचे समोर आले आहे. हीच अंडरवर्ल्डची बदलती पद्धत मानली जात आहे. पूर्वी टोळ्यांसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांची गरज भासत असे. आता मात्र डिजिटल माध्यमातून सामान्य तऊणांची निवड करून त्यांना छोट्या कामांपासून मोठ्या गुह्यांकडे ढकलले जाण्याची गेमींग पद्धत वापरली जात आहे. म्हणूनच शहजाद भट्टी प्रकरण हे केवळ एका पाकिस्तानी गँगस्टरची कहाणी राहिलेली नाही. हे अंडरवर्ल्ड, दहशतवाद आणि कथित स्पाय नेटवर्कचा बदलता चेहरा आहे. देशात अस्थिरता माजविण्यासाठी आणि देशाचे तुकडे करण्यासाठी सोशल मीडियावरील एका ‘फ्रेंड रिक्वेस्ट’पासून सुरू होणारा प्रवास एखाद्या तऊणाला देशद्रोहाच्या अंधाऱ्या जगात नेऊ शकतो, हा या प्रकरणाचा सर्वात मोठा इशारा आहे.
अमोल राऊत