Kolhapur | शुभेच्छांच्या वर्षावात रंगला 'गडहिंग्लज तरुण भारत'चा स्नेहमेळावा
गडहिंग्लजमध्ये ‘तरुण भारत संवाद’चा वर्धापनदिन उत्साहात
गडहिंग्लज - जे वाचकांच्या मनात ते 'तरुण भारत संवाद च्या पानात असे ब्रीद घेऊन गेल्या कित्येक वर्षांपासून तरुण भारत या विभागात कार्यरत आहे. 'तरुण भारत संवाद चा वाचकांशी असलेल्या अतुट नात्याचा वारंवार प्रत्यय येत असतोच, आज गडहिंग्लज कार्यालयाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने हा प्रत्यय पुन्हा एकदा आला, 'तरुण भारत संवाद च्या गडहिंग्लज कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांची मांदियाळी जमली होती.
वर्षापनदिनाचे औचित्य साधून 'तरुण भारत संवाद' ने प्रसिद्ध केलेल्या 'संस्कृती' या विशेषांकाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, शासकीय, वैद्यकीयआदी क्षेत्रासह वाचक, हितचिंतक यांनी 'तरुण भारत संवाद 'ला संवादमय शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या 'संस्कृती' या विशेषांकाचे साऱ्यांनी कौतुक केले. 'तरुण भारत संवादाचे समूह्यमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर, निवासी संपादक सुधाकर काशीद, गडहिंग्लज नगरपरिषदेचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, उपनगराध्यक्ष महेश सलवादे, गडहिंग्लज पंचायत समितीचे उपसभापती अमर हिडदुगी, जि. प. सदस्या शैलजा पाटील, नगरसेवक बसवराज खणगावे, अमर मांगले, नगरसेविका बिनादेवी कुराडे, प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, विभागीय वितरण व्यवस्थापक अमर पाटील, गडहिंग्लज तालुका विभागीय प्रतिनिधी जगदीश पाटील, चंदगड प्रतिनिधी विजयकुमार दळवी, आजरा प्रतिनिधी सुनील पाटील, श्रीरंग चौगुले, महेश गाडवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून 'संस्कृती' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण, नगरसेविका स्वाती कोरी, नगरसेवकरामगोंड पाटील, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, नगरसेविका मिनाक्षी कुराडे, अरुणा कोलते, सुजाता मांगले, रुपाली परीट, दर्शना कुंभार, स्वाती चौगुले, नगरसेवक नितीन देसाई, राजू जमादार, बाळासाहेब घुगरे गडहिंग्लजअर्बनचे चेअरमन जितेंद्र नाईक यांच्यासह संचालक मंडळ, भाजपा तालुकाध्यक्ष प्रितम कापसे, राजेंद्र तारळे, आप्पासाहेब कदम, शिवाजी करीगार, शिवगोंड पाटील, जि. प. सदस्य अमर चव्हाण, अनिरुद्ध रेडेकर,सारीका बटकडली, प्रभावती बागी, डीवायएसपी रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह क्रीडा, शैक्षणिक, सहकार, वैद्यकीय, राजकारण, विविध खात्यातील शासकीय अधिकारी आदी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपसंपादक भिकाजी मसवेकर, बाबू दुंडगे (गडहिंग्लज), वार्ताहर विनायक पाटील (नेसरी), एम. ए. शिंदे (हलकर्णी), प्रकाश चौगुले, (महागाव), आदेश विचारे (नूल), जाहिरात विभागाचे सुहास पाटील आदी उपस्थित होते. प्रा. आशपाक मकानदार, इरशाद मकानदार अनंत पाटील, एम. एस. बोजगर, जावेद बुडेखान, दिपक साखरे यांनी सूत्रसंचलन केले. राजश्री निकम यांनी काढलेली रांगोळी आकर्षक ठरली. हैदर जमादार यांनी मंडपाची देखणी मांडणी केली होती