महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भावी आमदारांचे भविष्य मशिनबंद

12:44 PM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्ह्यात 69 टक्के मतदान " मतदानाच्या टक्का अन् एक्झिट पोलवरुन तर्कवितर्क, जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी वादावादीचे प्रकार

Advertisement

सातारा : सातारा जिह्यातील आठ विधानसभा मतदार संघात शांततेत 3 हजार 165 मतदान केंद्रावर सुमारे 69 टक्के मतदान सांयकाळी सहा वाजेपर्यंत झाले. त्यामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत साताऱ्यात सर्वात कमी 58.55 टक्के तर सर्वात जास्त कोरेगावात 69.61 टक्के मतदान झाले असून 109 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून दि. 23 रोजी दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिह्यात महायुती की महाविकास आघाडी हे पहायला मिळणार असून झालेल्या मताच्या टक्केवारीचा फायदा नेमका कोणाला होणार आहे याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. मतदान कालावधीत जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील भोसे, खटाव तालुक्यातील कातरखटाव, बोंबाळे आदी ठिकाणी वादावादी झाली. तर काही ठिकाणी मतदान प्रक्रिया धिम्या गतीने सुरू असल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत.

Advertisement

सातारा जिह्यात विधानसभेकरता फलटणसाठी 3 लाख 38 हजार 464 मतदार असून सायंकाळी पाचवाजेपर्यंत 63.01 टक्के, वाईमध्ये 3 लाख 46 हजार 33 मतदार असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत 61.29 टक्के, कोरेगावमध्ये 3 लाख 18 जार 791 मतदार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 69.61 टक्के, माणमध्ये 3 लाख 57 हजार 841 मतदार असून सायंकाळी वाजेपर्यंत 60.69 टक्के, कराड उत्तरमध्ये 3 लाख 4 हजार 773 मतदार असून सायंकाळी पाचवाजेपर्यंत 67.23 टक्के, कराड दक्षिणमध्ये 3 लाख 13 हजार 300 मतदार असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत 67.91 टक्के, पाटणमध्ये 3लाख 8 हजार 354 मतदार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 66.39 टक्के, साताऱ्यात 3 लाख 41 हजार 355 मतदार असून सायंकाळी पाचवाजेपर्यंत 58.55 टक्के मतदान झाले असे जिह्यात एकूण 26 लाख 28 हजार 871 मतदार असून सायंकाळी पाच वाजेपर्यत 69 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे झालेल्या मतदानाचा टक्का कोणाला फायदेशीर ठरणार आहे. सातारा जिह्यात महायुतीचे प्रभूत्व ठरणार की महाविकास आघाडी येणार याचे चित्र दि. 23 रोजी स्पष्ट होणार आहे.

सातारा जिह्यात प्रचारामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी कुठेही कमी पडली नव्हती. तसेच अपक्ष उमेदवारही त्यांच्या पद्धतीने प्रचारात दंग होते. अशा सर्वच 109 उमेदवारांसाठी जिह्यातील 3 हजार 165 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. सकाळपासूनच मतदारांमध्ये प्रचंड निरुत्साह असल्याने दुपारी दीड वाजेपर्यंत केवळ 35 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 69 टक्के मतदान झाले असून सर्वच 109 उमेदवारांचे नशिब मतदान यंत्रात बंद झाले आहे. दि. 23 रोजी मतमोजणी होणार आहे. एकाने मतदान करताना फोटो अन् व्हिडीओ काढून त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा गोपूज येथे प्रकार घडला. त्यावरुन त्याच्यावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच प्रमुख लढत होत आहे. सातारा जावली, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, फलटण, कोरेगाव, खटाव माण, वाई खंडाळा महाबळेश्वर या आठही विधानसभा मतदार संघात मतदार संघात दोन्ही आघाड्याच्यावतीने जोरदार प्रचार करण्यात आला. अपक्षांनीही जोरदारपणे प्रचार केला. उमेदवारांसाठी मान्यवरांच्या मोठया सभाही पार पडल्या. त्यांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले होते. प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झाली. मतदारांच सकाळपासूनच मतदान करण्यासाठी निरुत्साह पहायला मिळाला. कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांना रांगेत तासनंतास ताटळकत उभे रहावे लागले नाही. मतदान करण्यासाठी एवढी गर्दी नसल्याने लगेच मतदानाची प्रक्रिया होत होती. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वच मतदानाच्या मशिन्स सुरक्षितठिकाणी अशा ठेवण्यात आल्या आहेत.

मतदान करतानाच हदय विकाराचा धक्का

खंडाळा तालुक्यातील मोर्वे येथे मतदान केंद्रात मतदान करताना श्याम नानासाहेब धायगुडे (वय 67) याचा हृदयविकाराचा धक्का बसला अन् ते जागीच कोसळले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. धायगुडे हे मुंबईत सनदी लेखापाल म्हणून होते. ते सेवानिवृत्तीनंतर गावी स्थायिक झाले होते. ते शेती करुन आपली गुजराण करत होते. दि. 20 रोजी ते सकाळी मतदान करण्यासाठी मोर्वे येथील मतदान केंद्रावर गेले होते. त्यांनी मतदान करण्यासाठी बटन दाबले अन् तेथेच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला तसा ते तेथेच कोसळले. ते खाली पडल्याने नेमका काय आवाज झाला म्हणून मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांनी पाहिले तर ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्या निधनाने मोर्वे गावावर शोककळा पसरली आहे.

लेवे बंधुच्यात जुन्या कारणावरुन हाणामारी

सातारा शहरातील मंगळवार पेठेत राहत असलेल्या लेवे बंधुच्यात जुन्या कारणावरुन वाद निर्माण झाला. या वादात हाणामारी होऊन दोघेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार पेठेत बुधवारी संध्याकाळी माजी नगरसेवक वसंत लेवे व पप्पु लेवे यांच्यात जुन्या भांडणावरुन वाद सुरु झाला. या वादातून पप्पु लेवेनी वसंत लेवे यांना मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भांडणे सोडवली. दोघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून अद्याप गुन्हा दाखल न झाल्याचे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिली. दरम्यान, हा वाद निवडणुकीच्या कारणावरुन झाला की काय याबाबत साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा पसरली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article