अमेरिका-इस्रायलच्या ऑपरेशनची पूर्ण कहाणी
अत्यंत सुरक्षित परिसरात मारले गेले इराणचे सर्वोच्च नेते
अमेरिका-इस्रायलने इराणची राजधानी तेहरातमधील अत्यंत सुरक्षित परिसराला लक्ष्य केले. या परिसरातच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे वास्तव्य होते. या हल्ल्यात खामेनेई यांना जीव गमवावा लागला आहे.
अचूक गुप्तचर माहिती
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए अनेक महिन्यांपासून खामेनेई यांच्या हालचाली आणि त्यांच्या पॅटर्नवर नजर ठेवून होती. अचानक बदलला प्लॅन: हल्ला शुक्रवारी रात्री अंधारात होणार होता, परंतु शनिवारी सकाळी होणाऱ्या गुप्त बैठकीची माहिती मिळताच प्लॅन बदलण्यात आला.
टार्गेटवर कोण होते : खामेनेई यांच्यासोबत आयआरजीसी प्रमुख, संरक्षणमंत्री आणि सैन्य परिषदेचे प्रमुख मुख्य टार्गेट होते.
हल्ल्याची तीव्रता : इस्रायलच्या लढाऊ विमानांनी खामेनेईंच्या निवासस्थानच्या परिसरावर जवळपास 30 बॉम्ब पाडविले.
अंत : 86 वर्षीय अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले, जे शिया समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरु होते. 1989 पासून इराणचे सर्वोच्च नेते होते.
सीआयएची ऑपरेशनमधील भूमिका
सीआयएने या ऑपरेशनमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सीआयए अनेक महिन्यांपासून खामेनेई यांच्या हालचालींवर नजर ठेवून होती. यादरम्यान सीआयएने खामेनेई यांची ठिकाणे आणि त्यांच्या दिनचर्येच्या पॅटर्नला समजून घेतले. शनिवारी सकाळी तेहरानच्या प्रमुख सरकारी परिसरात इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे सीआयएला कळले होते. सर्वात महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे खामेनेई स्वत: या बैठकीत उपस्थित राहणार ही होती. या इनपुटला त्वरित इस्रायलला पुरविण्यात आले. सीआयएच्या नजरेत ही माहिती ‘हाय फिडेटिली’ (पूर्णपणे) अचूक होती.
हल्ल्याची वेळ का बदलली?
मूळ योजनेनुसार अमेरिका आणि इस्रायल रात्रीच्यावेळी हल्ला करणार होते. परंतु सीआयएला या मोठ्या बैठकीची माहिती मिळताच दोन्ही देशांनी वेळ बदलण्याचा निर्णय घेतला. इराणचे राष्ट्रपती कार्यालय, सर्वोच्च नेत्याचे कार्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद तिन्ही एकाच परिसरात आहेत. येथे सर्वोच्च नेतृत्व एकावेळी उपस्थित होते. याचमुळे हल्ल्याची वेळ बदलून शनिवारी सकाळ करण्यात आली, जेणेकरून एकाच झटक्यात सर्वात मोठे यश मिळविता येईल.
इराणने गमाविले मोहरे
या बैठकीत इराणचे अनेक सर्वात शक्तिशाली सैन्य आणि सुरक्षा अधिकारी सामील होणार आहेत याची माहिती इस्रायलकडे पूर्वीच होती. या सर्वांना एकत्रित संपविण्याचे इस्रायलचे लक्ष्य होते. यात ही नावे सामील होती...
अयातुल्ला अली खामेनेई (सर्वोच्च नेते)
मोहम्मद पाकपुर (आयआरजीसीचे कमांडर इन चीफ)
अजीज नासिरजादेह (संरक्षणमंत्री)
अॅडमिरल अली शमखानी (सैन्य परिषदेचे प्रमुख)
सैयद माजिद मौसावी (आयआरजीसी एअरोस्पेस फोर्सचे कमांडर)
मोहम्मद शिराजी (उप गुप्तचरमंत्री)
हल्ला कसा अन् कधी झाला?
इस्रायलमध्ये शनिवारी सकाळी सुमारे 6 वाजता लढाऊ विमानांनी स्वत:च्या तळांवरून उ•ाण केले. हल्ल्यात मिवानंची संख्या तुलनेत कमी होती, परंतु ती दीर्घ पल्ल्याच्या आणि अत्यंत अचूक क्षेपणास्त्रांनी सज्ज होती. विमानांनी उ•ाण केल्याच्या दोन तास पाच मिनिटांनी तेहरानच्या प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी तेथील अत्यंत सुरक्षित परिसरावर क्षेपणास्त्रs पाडविण्यात आली. इराणने युद्धाची तयारी करून ठेवली होती. तरीही इस्रायल या हल्ल्यात ‘टॅक्टिकल सरप्राइज’ प्राप्त करण्यात यशस्वी ठरल्याचे उद्गार इस्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्याने काढले आहेत.
खामेनेई कुठल्या इमारतीत होते?
संबंधित परिसरातील एका इमारतीत इराणचे वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी बसले होते, तर खामेनेई त्याच परिसरातील एका वेगळ्या नजीकच्या इमारतीत होते. खामेनेई यांच्या ठिकाणाची ओळख पटताच इस्रायलच्या लढाऊ विमानांनी त्या परिसरावर 30 बॉम्ब पाडविले.
इराणच्या सैन्य अन् गुप्तचर व्यवस्थेला नुकसान
या ऑपरेशनमध्ये इराणच्या गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ नेतृत्व जवळपास संपुष्टात आले आहे. परंतु इराणचा सर्वोच्च गुप्तचर अधिकारी वाचला आहे. प्रारंभिक हल्ल्यानंत आणखी काही ठिकाणी हल्ले करण्यात आले, जेथे इराणचे गुप्तचर अधिकारी थांबले होते.
अचूक माहिती कुठून मिळाली?
मागील वर्षी झालेल्या 12 दिवसांच्या संघर्षातून अमेरिकेला खामेनेई यांच्याविषयी माहिती मिळविता आली आहे. दबावाच्या स्थितीत खामेनेई आणि आयआरजीसी कशाप्रकारे संवाद साधतात आणि कशाप्रकारचे वर्तन करतात हे अमेरिकेने समजून घेतले. याचा वापर करत अमेरिकेने खामेनेई यांच्या हालचालींवर पाळत अन् त्यांच्या पुढील पावलाचा अनुमान लावण्याची क्षमता आणखी धारदार केली. याच नेटवर्कच्या आधारावर जून महिन्यात अध्यक्ष ट्रम्प यांनी खामेनेई कुठे लपले आहेत हे अमेरिका जाणून असल्याचा दावा केला होता.
इराणची सर्वात मोठी चूक
इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी स्वत:च्या बचावासाठी पुरेशी खबरदारी बाळगली नाही हे या ऑपरेशनमधून स्पष्ट झाले आहे. तर इस्रायल आणि अमेरिका दोघांनी आपण युद्धाची तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत पूर्वीच दिले होते. अशा नाजुक काळात इतके वरिष्ठ अधिकारी एकत्र येणे आणि खामेनेई देखील त्याच परिसरात उपस्थित राहणे एक घातक रणनीतिक चूक ठरली आहे.
खामेनेई शनिवारी संध्याकाळी ही बैठक करतील असे मानले जात होते. परंतु इस्रायलच्या मोसादने बैठकीची वेळ बदलून शनिवारी सकाळ करण्यात आल्याचे शोधून काढले होते. ही एकच माहिती पुरेशी होती. हल्ल्याचे पूर्ण टायमिंग यामुळे बदलण्यात आले आणि इराणला याचा सुगावा देखील लागू देण्यात आला नाही.
पुढे काय घडणार?
अमेरिका-इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेतृत्व संपविले आहे, परंतु इराणची सिस्टीम अशाप्रकारचे झटके झेलण्यासाठीच तयार करण्यात आली होती. तेथे प्रत्येक पदासाठी उत्तराधिकाऱ्याचे चार स्तर पूर्वीपासून निश्चित आहेत.
कोण होते खामेनेई?
1989 मध्ये इस्लामिक क्रांतिचे सूत्रधार अयातुल्लाह रुहुल्लाह खुमैनींचे निधन झाल्यावर खामेनेई यांनी इराणची धुरा सांभाळली होती. खुमैनी यांनी पहलवी राजघराण्याला सत्तेवरून दूर करण्याचा पाया रचला होता, परंतु त्या क्रांतिला एका पोलादी सैन्य अणि निमलष्करी संरचनेत बदलण्याचे काम खामेनेई यांनी केले. खामेनेई यांनी निर्माण केलेली व्यवस्था इराणचे रक्षण करत होती आणि त्याचा दबदबा सीमेपलिकडेही कायम ठेवत होती.
1980 च्या दशकात इराकसोबत झालेल्या रक्तरंजित युद्धादरम्यान खामेनेई हे इराणचे राष्ट्रपती होते. त्यावेळी थकविणाऱ्या संघर्षात पाश्चिमात्य देश इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसैन यांची साथ देत होते, तर इराण एकटा अन् वेढलेला होता. याच काळात खामेनेई यांच्या मनात खासकरून अमेरिकेबद्दल अविश्वास निर्माण झाला होता.
1981 मध्ये काय घडले?
खामेनेई हे 1981 च्या तेहरान येथील मशिदीत एका मोठ्या हल्ल्यातून सुदैवाने बचावले होते. त्यावेळी ते सर्वोच्च नेते नव्हेतर एक प्रभावशाली धर्मगुरु होते. हल्लेखोराने एका टेप रिकॉर्डरच्या आत बॉम्ब पेरून तो पोडियमनजीक ठेवला होता. खामेनेई यांचे संबोधन सुरू होताच त्याचा स्फोट झाला होता.