For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वजन घटविण्याचा भीतीदायक ट्रेंड

06:04 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
वजन घटविण्याचा भीतीदायक ट्रेंड
Advertisement

तोंडाला प्लास्टिक गुंडाळून अन्न चावण्याचा प्रकार

Advertisement

वजन घटविणे किंवा स्लीम दिसण्याच्या इच्छेपोटी माणूसही काहीही करू शकतो. चीनमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सध्या अत्यंत अजब आणि धोकादायक ‘ईटिंग हॅक’ व्हायरल होत आहे. या ट्रेंड अंतर्गत युवा स्वत:च्या पूर्ण तोंड आणि ओठांवर क्लींग फिल्म्स किंवा प्लास्टिक रॅप गुंडाळत आहेत आणि मग त्यावरून अन्न चावण्याचे नाटक करत आहेत. आपण अन्नाचा आनंद तर घेऊ शकतो, परंतु एकही कॅलरी  शरीरात जाणार नाही असा यामागील तर्क आहे. या विचित्र प्रवृत्तीचा आधार अत्यंत सरल आहे, परंतु भीतीदायक आहे. प्लास्टिक रॅप एका अडथळ्याच्या रुपात कार्य करते, जे भोजनाला थेट लाळ किंवा पचनतंत्राच्या संपर्कात येण्यापासून रोखते.

लोक खाण्याला जोरजोरात चावत असतात आणि मग त्याला बाहेर काढून फेकून देतात. यामुळे मेंदूला हा भ्रम होतो की शरीराला पोषण मिळतेय, त्यामुळे भूक शांत झाल्याच वाटते असा त्यांचा दावा आहे. परंतु वैद्यकीय तज्ञ या दाव्याला पूर्णपणे फेटाळतात आणि याला एका मोठ्या आरोग्य समस्येची चाहुल मानत आहेत. हे केवळ एक वजन घटविणारे नसून तर गंभीर ईटिंग डिसऑर्डर (उदाहरणार्थ बुलिमिया आणि एनोरेक्सिया)ला बळ देणारी पद्धत असल्याचे त्यांचे सांगणे आहे. जेव्हा आपण अन्न चावून थुंकतो तेव्हा शरीराला शक्ती मिळत नाही, ज्यामुळे वेळेसोबत खाण्याची लालसा आणखी वाढते. हे मेंदूला अशाप्रकारे ‘रिवायर’ करते की त्याला कॅलरीमुक्त केवळ स्वाद आणि स्वरुपामुळे आनंद मिळू लागतो, जो मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

Advertisement

प्लास्टिक रॅपला सातत्याने दातांनी चावल्याने मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक्स शरीरात पोहोचण्याचा धोका असतो. चावण्याच्या प्रक्रियेदरम्यान प्लास्टिकचे सुक्ष्म कण लाळेसोबत मिसळतात आणि ते श्वसन किंवा पचनतंत्रात पोहोचू शकतात. ज्यामुळे कॅन्सर आणि हार्मोनल असंतुलन यासारख्या गंभीर समस्या होऊ शकतात. प्लास्टिक रॅपसोबत अन्न चावणे एक छोट्या प्रयोगात सुरू झाले असले तरीही आता हे लाखो ह्यूज मिळविणारा एक पूर्ण इंटरनेट ट्रेंड ठरला आहे. सोशल मीडियावर यावरून चर्चा रंगत आहे.

Advertisement
Tags :

.