For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला आज प्रारंभ

06:20 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला आज प्रारंभ
Advertisement

सिनर, जोकोविच, गॉफ, साबालेंका यांच्यात जेतेपदासाठी चुरस

Advertisement

वृत्तसंस्था, पॅरिस

2026 च्या टेनिस हंगामातील येथे रोलँड गॅरोच्या रेड क्लेकोर्ट टेनिस कोर्टवर रविवारपासून फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. चालू वर्षीच्या हंगामातील ही दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. या स्पर्धेचा ड्रॉ नुकताच काढण्यात आला. आणि त्यामध्ये सिनरला तो अधिक सोपा असून जोकोविचला थोडा खडतर प्रवास करावा लागेल असा अंदाज आहे.

Advertisement

या स्पर्धेत पुरुष विभागात इटलीचा टॉप सिडेड जेनिक सिनर तसेच सर्बियाचा माजी टॉप सिडेड जोकोविच, जर्मनीचा व्हेरेव्ह, रशियाचा मेदवेदेव्ह यांच्यात यावेळी जेतेपदासाठी चुरस पहावयास मिळेल. मात्र या स्पर्धेतील विद्यमान विजेता स्पेनचा कार्लोस अल्कारेझ दुखापतीमुळे यावेळी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाही. त्याची गैरहजेरी चांगलीच जाणवेल. महिलांच्या विभागात अमेरिकेची टॉप सिडेड कोको गॉफने गेल्या वर्षी या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. यावेळी ती पुन्हा हे विजेतेपद स्वत: कडे राखण्यासाठी प्रयत्न करेल. महिलांच्या विभागात टॉप सिडेड बेलारुसची आर्यना साबालेंका दुखापतीतून पुर्णपणे तंदुरूस्त झाली असून ती आता जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत साबालेंकाला कोको गॉफने पराभूत केले होते.

पुरुषांच्या विभागात यावेळी अल्कारेझच्या गैरहजेरीत इटलीचा टॉप सिडेड जेनिक सिनर हा संभाव्य विजेता म्हणून ओळखला जातो. पुरुष एकेरीच्या ड्रॉ नुसार त्याचा सलामीचा सामना फ्रान्सच्या वाईल्ड कार्डधारक क्लिमेंट टेबुरशी होणार आहे. सिनरला कदाचित तिसऱ्या फेरीत फ्रान्सच्या मॉलेटशी तसेच उपांत्य फेरीत कॅनडाच्या अॅलिसिमेशी गाठ पडू शकेल. आतापर्यंत 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणारा सर्बियाचा जोकोविच याचा सलामीचा सामना फ्रान्सच्या मिपेशी पेरीकार्डबरोबर होणार आहे. कास्पर रूडने आतापर्यंत दोन वेळेला या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. जर्मनीच्या व्हेरेव्हचा सलामीचा सामना फ्रान्सच्या बेंजामिन बोन्झीबरोबर होणार आहे. फ्रान्सच्या गेल मोनफिल्सचा सलामीचा सामना फ्रान्सच्या हुगो गॅस्टोन बरोबर होईल. मोनफिल्सची ही शेवटची स्पर्धा अपेक्षित आहे. तसेच 17 वा मानांकित आर्थर फिल्सचा सलामीचा सामना स्वीसच्या वावरिंकाबरोबर होणार आहे. वावरिंकाची ही शेवटची स्पर्धा असून त्यानंतर तो टेनिसमधून निवृत्त होत आहे. सर्बियाचा जोकोविच याला आता व्हिक्टर ट्रोस्कि हा नवा प्रशिक्षक लाभला आहे. ट्रोस्किच्या मार्गदर्शनाखाली जोकोविचा आता ऐतिहासिक 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. सध्या आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रामध्ये सर्बियाचा जोकोविच आणि अमेरिकेची माजी महिला टेनिसपटू मार्गारेट कोर्ट यांनी समान 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. जोकोविच आता 39 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

महिलांच्या विभागात अमेरिकेची विद्यमान विजेती कोको गॉफचा सलामीचा सामना अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंड बरोबर होणार आहे. तर बेलारुसची टॉप सिडेड आर्यना साबालेंका हिची सलामीची लढत स्पेनच्या जेसिका मॅनेरिओशी होणार आहे. रशियाची 22 वी मानांकित अॅना कॅलिनस्काय ही महिला एकेरीच्या ड्रॉ नुसार गॉफच्या विभागात असून तिची चौथ्या फेरीत गाठ कदाचित गॉफ बरोबर पडू शकेल. गॉफ आणि साबालेंका यांच्यात गेल्या वर्षी या स्पर्धेत अंतिम सामना झाला होता. त्यानंतर उभय खेळाडुंमध्ये यावेळी सदर स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत गाठ पडणार नाही असे वाटते. आतापर्यंत चार वेळेला फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी पोलंडची इगा स्वायटेक हिचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाच्या इमर्सन जोन्सबरोबर होणार आहे. स्वायटेकला उपांत्यपूर्व फेरीत कदाचित स्विटोलिनाशी लढत द्यावी लागेल. युक्रेची इलिना रायबाकिना ही आता आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकण्यासाठी आतूरलेली आहे. गेल्या जानेवारीत तिने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा तर 2022 मध्ये विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. युक्रेनची मार्टा कोस्ट्युक तसेच रशियाची 19 वर्षीय मीरा अँड्रीव्हा यांच्याकडून अव्वल खेळाडुंना निश्चितच धोका राहिल.

फ्रेंच स्पर्धेत टेनिसपटुंची मागणी

फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आयोजक आणि अव्वल टेनिसपटुंमध्ये आता काही समस्यांसंदर्भात वाद निर्माण झाला आहे. टेनिसपटुंनी या स्पर्धेत आपल्या उत्पन्नात न्यायवाटा तसेच प्रतिनिधीत्वामध्ये बळकटता यांची मागणी फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा आयोजकांकडे केली आहे. टेनिसपटुंच्या या मागणीमध्ये आयोजक आणि टेनिसपटू यांच्यात थोडी कलुशितता निर्माण झाली आहे. या मागणीमुळे कदाचित क्रीडा क्षेत्रावर विपरित परिणामही होऊ शकतो.

शुक्रवारी या स्पर्धेच्या पात्र फेरी सामन्यांपूर्वी आयोजित केलेल्या प्रसार माध्यम दिनानिमित्त अनेक टेनिसपटुंनी प्रसार माध्यमांशी आपल्या मुलाखती आयोजकांच्या उत्पन्नातील न्यायवाटा मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच या स्पर्धेच्या प्रतिधित्वामध्ये अधिक बळकटी रहावी असेही टेनिसपटुंनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.