For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Indrayani rice Dushehre | कराडचा सुगंधी वारसा! इंद्रायणी भाताने ओलांडल्या राज्याच्या सीमा; पुणे-मुंबईत मोठी मागणी

05:06 PM Apr 09, 2026 IST | NEETA POTDAR
indrayani rice dushehre   कराडचा सुगंधी वारसा  इंद्रायणी भाताने ओलांडल्या राज्याच्या सीमा  पुणे मुंबईत मोठी मागणी
Advertisement

                                                 दुशेरेच्या इंद्रायणीचा दरवळ देशभर!

Advertisement

दुशेरे ( विकास जाधव ): कराड तालुक्यातील दुशेरे गावाने पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडत इंद्रायणी भाताच्या माध्यमातून नवे यश मिळवले आहे. कृष्णा नदीकाठच्या सुपीक भूमीत पिकवला जाणारा हा सुगंधी भात आता केवळ स्थानिक बाजारापुरता मर्यादित न राहता राज्यासह देशभरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागला आहे. दुशेरेचा इंद्रायणी भात हा हळूहळू एक स्वतंत्र ब्रेड म्हणून उदयास येत असून, शेतकऱ्यांच्या कष्टांना नव्या ओळखीची जोड मिळत आहे.

कराड तालुक्यातील शेती हीप्रामुख्याने नदीकाठच्या पाण्यावर आधारित असल्याने येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात. ऊस हे मुख्य पीक असले तरी शेतीला फायदेशीर बनवण्यासाठी भातासारख्या पर्यायी पिकांवरही भर दिला जातो. अशाच प्रयोगशील वृत्तीमधून दुशेरे गावात इंद्रायणी भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणातसुरू झाले. पूर्वी जया, दोडकी यांसारख्या पारंपरिक वाणांचा भात घेतला जात होता. मात्र गेल्या काही दशकांत इंद्रायणी भाताच्या लागवडीने सकारात्मक बदल घडवला. सुरुवातीला या नव्या वाणाबाबत काहीशी साशंकता होती,

Advertisement

मात्र त्याचादर्जा, सुगंध आणि बाजारातील वाढती मागणी पाहता शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे झुकला आहे. आज इंद्रायणी भाताने राज्यभर आपली छाप निर्माण केली आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड यांसारख्या शहरांमध्ये या तांदळाला विशेषमागणी असून राज्याबाहेरही विस्तार होत आहे.

या भाताचे पौष्टिक, सात्विक आणि आरोग्यदायी गुणधर्म हे त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. साधारण दीडशे दिवसांत तयार होणारा हा भात पचायला हलका आणि चवदार असल्याने ग्राहकांचा त्याच्याकडे ओढा आहे. लहान मुलांसाठी बनवली जाणारी पेजही या भातामुळे अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक ठरते. त्यामुळे घरगुती वापरासाठीही या भाताची मागणी सातत्याने वाढत आहे. स्थानिक माती, हवामान आणि पाण्याच्या गुणधर्मांमुळे या भाताला मिळणारा खास सुगंध आणि चव त्याला वेगळी ओळख देतात.

योग्य व्यवस्थापन

दुशेरेच्या इंद्रायणीच्या भाताला सुगंध व चव येण्याचे कारण म्हणजे भातपिकाचे योग्य व्यवस्थापन आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळेच दुशेरेचा इंद्रायणी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. मारूती संतराम जाधव, माजी प्राध्यापक, राहुरी विद्यापीठप्रोत्साहन मिळायला हवेशेतीत नवनवीन प्रयोग साकारत शेतीचे उत्पन्न वाढवले आहे. आता इंद्रायणी भात नावारूपाला येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना राबवण्याची गरज आहे . चंद्रकात दत्तु जाधव, प्रगतशील शेतकरी

Advertisement
Tags :

.