Kolhapur : गहिनीनाथ गैबीपीर चरणी चौथा गलेफ विधीवत अर्पण !
समरजितसिंह घाटगे, राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांच्या हस्ते गलेफ
कागल : येथील ऐतिहासिक श्री गहिनीनाथ गैबीपीर ऊरूस सोहळ्याच्या निमिताने कागल सिनियर घाटगे घराण्याचा मानाचा व पारंपरिक चौथा गलेफ विधीवत अर्पण करण्यात आला. शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे व वीरेंद्रसिंह घाटगे यांच्या हरते भक्तीमय वातावरणात गलेफ अर्पण करण्यात आला.
सालाबादप्रमाणे भिकाजी रेळेकर यांच्या घरी आयोजित सत्यनारायण पूजेचे दर्शनसुद्धा घाटगे बंधूंनी घेतले. या वेळी ऊरुस समितीचे अध्यक्ष रणजीत पाटील, शाहू साखर कारखान्याचे संचालक रमेश माळी, सतीश पाटील, राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत, संचालक दीपक मगर, अरुण गुरव, सुशांत कालेकर, माजी उपनगराध्यक्ष संजय कदम, राजेंद्र जाधव, सूर्यकांत कदम, रमीज मुजावर, हिदायत नायकवडी, बाळासो नाईक, गजानन माने व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गलेफ अर्पणानंतर उपस्थित मान्यवरांनी श्री गहिनीनाथ गैबीपीर चरणी नतमस्तक होऊन भावपूर्ण प्रार्थना केली.