महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विल्सन गार्डन नागसह चौघांना हिंडलगा कारागृहात हलविले

12:17 PM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथील गुंड विल्सन गार्डन नागसह त्याच्या चार साथीदारांना रविवारी सायंकाळी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे. चित्रपट अभिनेते दर्शनची बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात बडदास्त ठेवल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. चित्रदुर्ग येथील रेणुका स्वामी खून प्रकरणात अटकेत असलेला दर्शन व त्याच्या साथीदारांना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात हलविण्यात आले आहे. याच प्रकरणात विल्सन गार्डन नाग व त्याचे साथीदार ठळक चर्चेत आले होते. परप्पन अग्रहार पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

न्यायालयाची परवानगी घेऊन परप्पन अग्रहार कारागृहातील अधिकाऱ्यांनी विल्सन गार्डन नाग, ग्रेस वॉल्टर, वेलू व मनोहर या चौघा जणांना रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात हलविले आहेत. यासाठी आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून नाग व त्याच्या साथीदारांना बेळगावला हलविण्यात आले आहे. दर्शनचा साथीदार प्रदूष याला तीन आठवड्यांपूर्वी हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले आहे. आता दर्शनची बडदास्त ठेवणाऱ्या विल्सन गार्डन नाग व त्याच्या साथीदारांसह चौघा जणांना बेळगावला हलविण्यात आले असून या स्थलांतरामुळे कारागृहात खबरदारी घेण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article