शिक्षणाची मूलभूत कौशल्ये आयुष्यभर शिकत राहण्याचा पाया
पाठ्यापुस्तके आणि वर्गांच्या पलीकडे जाऊन, झपाट्याने बदलणाऱ्या जगात व्यक्तीची विचार करण्याची, संवाद साधण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता ही त्याची कौशल्ल्ये घडवतात. वाचन, लेखन, श्रवण, संभाषण, अंकगणित, चिकित्सक विचार, समस्या निराकरण, सामाजिक संवाद, डिजिटल साक्षरता आणि वेळेचे व्यवस्थापन यांसारखी आवश्यक कौशल्ये विकसित करून, विद्यार्थी शैक्षणिक यश मिळवू शकतात आणि समाजाचे सक्षम व जबाबदार सदस्य बनू शकतात.
विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख क्षमता म्हणजे व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी आवश्यक कौशल्यांचा संच आहे. या क्षमता युनेस्कोने परिभाषित केल्या आहेत आणि समकालीन जगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्या मूलभूत आहेत. त्या प्रत्येकाची विशिष्ट वैशिष्ट्यो आहेत जी व्यक्तीच्या जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये वाढ आणि यशात योगदान देतात. या क्षमता विकसित करून, वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासाठी महत्त्वाच्या असलेल्या संवाद कौशल्ये, टीमवर्क, समस्या सोडवणे, सर्जनशीलता आणि इतर कौशल्यांमध्ये सुधारणा करणे शक्य आहे. कोणत्याही गुंतागुंतीच्या कार्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये, ज्ञान आणि वर्तने अशी त्यांची व्याख्या केली जाते. ही संकल्पना सामान्यत: कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात वापरली जाते. तथापि, त्यांचा अभ्यास शिक्षणासारख्या इतर ठिकाणी देखील केला जाऊ शकतो.
एकविसाव्या शतकातील प्रत्येक विद्यार्थ्यास जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी चिकित्सक विचार आणि सर्जनशील मानसिकता ही दोन मूलभूत कौशल्ये आवश्यक आहेत. एकविसाव्या शतकातील कौशल्यांची अशी कोणतीही स्पष्ट व्याख्या नसली तरीही, ही काही ठराविक कौशल्ये आहेत जी या तांत्रिकदृष्ट्या प्रगत वैश्विक वातावरणात जगण्यासाठी आवश्यक आहेत. एकविसाव्या शतकातील कौशल्ये ही अशी कौशल्ये आहेत जी एखाद्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असतात जेणेकरून तो/ती आपल्या समाजाच्या/राष्ट्राच्या आणि जगाच्या प्रगती आणि विकासात योगदान देऊ शकेल.
1.चिकित्सक विचार करणे- क्रिटिकल थिंकिंग किंवा चिकित्सक विचार पद्धती म्हणजे केवळ माहिती मिळवणे नव्हे, तर त्या माहितीचे सखोल विश्लेषण करून, त्यातील सत्यता पडताळून पाहणे आणि तर्कसंगत निर्णय घेण्याची क्षमता होय. चिकित्सक विचार म्हणजे कोणत्याही गोष्टीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करण्याचे कौशल्य असणे होय. साध्या शब्दात सांगायचे तर, समोर आलेली माहिती जशीच्या तशी न स्वीकारता, तिला ‘का?’, ‘कसे?’, ‘कुणी?’ आणि ‘कशासाठी?’ हे प्रश्न विचारणे म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण माहितीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करतो.
- संप्रेषण- संप्रेषण म्हणजे एखाद्याची मते, इच्छा, गरजा, शंका इत्यादी योग्यरित्या, शाब्दिक आणि अशाब्दिक पद्धतीने व्यक्त करण्याची क्षमता होय. आज संप्रेषणाची माध्यमे बदलली असली तरीही आभासी संप्रेषण करता येण्याची हातोटी असणे आवश्यक आहे. कोणत्याही कामाच्या वातावरणात स्पष्ट आणि ठामपणे संवाद साधण्याची क्षमता आवश्यक आहे. माहिती कार्यक्षमतेने कशी पोहोचवायची आणि प्राप्त झालेले संदेश कसे समजून घ्यायचे हे जाणून घेणे हे चांगल्या व्यावसायिक कामगिरीचे आवश्यक पैलू आहेत.
3.वेळेचे व्यवस्थापन आणि संघटनात्मक कौशल्ये- शैक्षणिक यशासाठी वेळेचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी कामांना प्राधान्य कसे द्यावे आणि संघटित कसे राहावे हे शिकले पाहिजे. यामध्ये यांचा समावेश आहे: नियोजन आणि वेळापत्रक तयार करणे, ध्येय निश्चित करणे, मुदतीचे पालन करणे, वेळेचे चांगले व्यवस्थापन तणाव कमी करते आणि उत्पादकता सुधारते. आपल्या सर्वांना दिवसाचे सारखेच 24 तास मिळतात. काही लोक इतरांपेक्षा त्यांच्या वेळेपेक्षा अधिक काम करतात असे का दिसते? याचे उत्तर आहे वेळेचे चांगले व्यवस्थापन. तुमचा वेळ वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीमध्ये कसा विभागायचा याचे आयोजन करण्याची प्रक्रिया आहे. एकदा का वेळचे व्यवस्थापन तुम्हाला जमले की तुम्ही कमी वेळेत अधिक हुशारीने काम कराल. आणि हे मुळीच कठीण नाही. सर्वोच्च यश मिळविणारे त्यांचा वेळ अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करतात. वेळेचे चांगले नियोजन केल्यास आपण कुठलेही काम कमी वेळेत आणि कमी तणावात करू शकतो. वेळेचे नियोजन केल्यास आपण आपली कार्यक्षमता आणि उत्पादक क्षमता वाढवू शकतो.
प्रा. डॉ. गिरीश नाईक