For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सापडलेले १ लाख ४० हजाराचे दागिने शेतकऱ्याने प्रामाणिकपणे केले परत

10:22 PM Dec 15, 2022 IST | Abhijeet Khandekar
सापडलेले १ लाख ४० हजाराचे दागिने शेतकऱ्याने प्रामाणिकपणे केले परत
Advertisement

गवशी येथील शेतकऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक

युवराज भित्तम / म्हासुर्ली

Advertisement

सध्याच्या धावपळीच्या युगात समाजातील प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना गवशी (ता.राधानगरी) येथील शेतकरी निवृत्ती कांबळे यांनी कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या म्हासुर्ली - झापाचीवाडी येथील सरदार तानाजी घाटगे यांचे १ लाख ४० हजार रुपये किमंतीचे रस्त्यावर सापडलेल्या दागिन्यांची पर्स व सर्व ओळखपत्रे प्रामाणिकपणे परत केली.कांबळे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

म्हासुर्ली - झापाचीवाडी येथील युवक सरदार घाटगे हे कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत आहे.ते पत्नी वंदना यांच्यासह २१ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथून म्हासुर्ली गावाकडे मोटरसायकल वरून प्रवास करत होते.याच दरम्यान त्यांच्या पत्नीच्या पर्समध्ये सोन्याचे सव्वादोन तोळ्याचे गंठण, गळ्यातीळ टीक, व मुलीच्या कानातील रिंगा व घाटगे यांची सर्व ओळखपत्र ठेवण्यात आली होती.

Advertisement

मात्र प्रवास करत असताना पत्नीकडे असलेली दागिन्याची पर्स गाडीवरून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.मात्र गावाजवळ आल्यावर पर्स पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी म्हासुर्ली - कळे मार्गावर पुन्हा परत जात हरवलेल्या पर्सचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पर्स मिळून आली नाही.त्यामुळे घाटगे कुटुंबीय नाराज झाले होते.

याच दरम्यान गवशी येथील शेतकरी निवृत्ती कांबळे हे म्हासुर्ली गावा लगत असलेल्या आपल्या जागेत नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी स्वच्छता करत होते. त्यावेळी त्यांना सदर पर्स रस्त्याकडेला नाल्यात सापडली.ती त्यांनी उघडून पाहिली असता त्यात त्यांना दागिने असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ती पर्स त्यांनी तशीच घरी आणून सुरक्षित पणे ठेवली होती.

त्यानंतर पर्स मधील ओळखपत्रावरुन निवृत्ती कांबळे यांचा मुलगा व सुनेने सरदार घाटगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत दागिने सुरक्षित असल्याचे सांगितले.त्यानुसार दुसऱ्या दिवशी घाटगे हे कांबळे यांच्या घरी गेले.यावेळी कांबळे परिवाराने सदर दागिन्यांची पर्स त्यांच्याकडे सुपूर्द केली.यावेळी घाटगे यांनी निवृत्ती कांबळे यांना भेट म्हणून पाच हजार रुपये देत त्यांचा सत्कार केला.परिणामी निवृत्ती कांबळे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :

.