कार्वे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागने दिले जीवदान
शिराळा / प्रतिनिधी
कार्वे (ता.वाळवा) येथील शेतकरी भिमराव ज्ञानू पाटील यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत बिबट वन्यप्राणी पाण्यामध्ये पडला असल्याची माहिती दुरध्वनीरुन वसविभास मिळाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यांची तात्काळ दखल घेत घटनास्थळी धाव घेतली व
विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले.
बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक निता कट्टे, डॉ. अजीत सांजणे सहा वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाबाली वनक्षेत्रपाल शिराळा ए. जी. पारधी, अनिल वाझे वनपाल बिळाशी, डी. बी. बर्गे वनपाल इस्लामपूर, हनमंत पाटील, वनरक्षक, तसेच अक्षय शिंदे, भिवा केळेकर व कायम वनमजूर तसेच वनकर्मचारी व प्राणीमित्र सुशिलकुमार गायकवाड विशाल पाटील, युनूस मणेर व रेस्क्यू टीम यांनी घटनास्थही पोहचून वस्थुस्थितीची पाहणी केली. त्यावेळी बिबट वन्यप्राणी विहीरीमध्ये दिसून आला. सदर बिबटया हा एक ते दीड वर्ष वयाचा आहे.
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनअधिकारी, प्राणीमित्र व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने क्रेनच्या सहाय्याने विहीरीमधून साडे दहाच्या सुमारास पिंजर्यात पकडून सुरक्षितपणे बाहेर काढले.
तरी पशुवैदयकीय अधिकारी शिराळा यांनी संबंधित बिबट्याची तपासणी केली असता तो नैसर्गिक अधिवासात तंदुरुस्त असल्याचे आढळून आले असून त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांनी दिली.