For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कास हंगामाचा फुटला नारळ...उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या हस्ते उद्घाटन

05:04 PM Sep 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
कास हंगामाचा फुटला नारळ   उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या हस्ते उद्घाटन
Kaas Plateau bursting blossoms
Advertisement

कास वार्ताहर

जागतिक वारसा स्थळ असलेल्या वर्ल्ड हेरिटेज कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामाचा नारळ फुटला असून उद्घाटन उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या हस्ते संपन्न झाले.

Advertisement

या कार्यक्रमास उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहायक वनसंरक्षक प्रदीप रौधाळ, तहसीलदार हनुमंत कोळेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर, सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, जावली वनक्षेत्रपाल हणमंत गमरे, वनपाल राजाराम काशिद कास समितीचे अध्यक्ष दत्ता किर्दत, उपाध्यक्ष प्रदिप कदम, समितीचे सदस्य सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर आखाडे, विठ्ठल कदम, रामचंद्र उंबरकर, विजय वेंदे, विकास किर्दत. ... आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी समितीकडून पर्यटकांसाठीच्या सर्व सोयी सुविधांची तयारी करण्यात आली असून यावर्षी प्रथमच पर्यटकांच्या करिता पाऊस आणि उन्हापासून संरक्षणासाठी नैसर्गिक रित्या सहा निवारा शेड तयार करण्यात आली आहेत. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना ऑनलाइन ची सुविधा www.kas.ind.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क १५० रुपये, गाईड फी शंभर रुपये ( प्रति ग्रुप १० पर्यटक संख्या), उपद्रव शुल्क दोन हजार रुपये, बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना 40 रुपये प्रवेश शुल्क मात्र सोमवार ते शुक्रवार येणे बंधनकारक असेल तसेच संबंधित शाळा कॉलेज महाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांचे पत्र आवश्यक असेल. हंगामा करिता सहा गावातील १३० हंगामी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पार्किंग ते कास पुष्प पठार यादरम्यान पर्यटकांसाठी मोफत बस सेवा पुरविली जाणार आहे तसेच पार्किंग मध्ये सहा शौचालयांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे तसेच ठीक ठिकाणी पिण्यासाठी मिनरल वॉटर चे पाणी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कास पुष्प पठारावर सद्यस्थितीमध्ये चवर,टोपली कारवी, दिपकांडी,आभाळी, सीतेची आसवे, सोनकी,तेरडा, भारांगी,धनगरी फेटा,तुतारी,कुमुदिनी यासह अनेक प्रकारची फुले उमलेली असून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये नैसर्गिक मध्ये ज्या प्रकारे बदल होतात त्याप्रमाणे इतर देखील फुले पर्यटकांना वेगवेगळ्या टप्प्यात पाहता येणार आहेत. त्यामुळे यावर्षींच्या कासच्या फुलोत्सवाची पर्वणी आता पर्यटकांसाठी खुली झाली आहे.

मद्यपान करणाऱ्यांवर देखील बसणार वचक.
कास पुष्प पठारावर सर्व स्तरातील पर्यटक हे फुले पाहण्यासाठी येत असतात काही पर्यटक हे पठारावर मद्यपान देखील करून येत असतात त्यामुळे अशा पर्यटकांवर वचक बसण्यासाठी समितीच्या माध्यमातून मद्यपान चेकिंग मशीन खरेदी करण्यात येणार असून कोणते पर्यटक पठारावर मद्यपान करून आलेले आहेत हे देखील आता समजणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.