महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुंबईहून बेळगावला येणारे विमान अचानक रद्द

11:07 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विमानात बसलेले प्रवासी पुन्हा माघारी, गैरसोय झाल्याने प्रवाशांचा संताप

Advertisement

बेळगाव : मुंबईहून बेळगावला येणारे विमान मंगळवारी अचानक रद्द करण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आल्याने विमानात बसलेल्या प्रवाशांना रनवेवरूनच माघारी फिरावे लागले. गैरसोय झाल्याने प्रवाशांनी विमानतळावरच आपला रोष व्यक्त केला. प्रवाशांमध्ये अधिक तर ज्येष्ठ नागरिक असल्याने विमान कंपनी विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. स्टार एयरचे विमान मंगळवारी सायंकाळी मुंबई येथील प्रवाशांना घेऊन बेळगावला येण्याच्या तयारीत होते. प्रवासीदेखील विमानात बेळगावला येण्याच्या प्रतीक्षेत होते. परंतु विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाकडून प्रवाशांना सांगण्यात आले. तांत्रिक बिघाड झाल्याने विमान बेळगावला जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर प्रवाशांचा राग अनावर झाला. यामुळे काही प्रवाशांनी विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे काहीकाळ वादावादीचे प्रसंग घडले. प्रवाशांमध्ये अधिक तर ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांची गैरसोय झाली. विमानातून पुन्हा माघारी घरी परतावे लागल्याने संताप अनावर झाला. मुंबई विमानतळावर चेक ईन करून विमानामध्ये बसण्यापर्यंत अर्धा दिवसाचा वेळ वाया गेला.

Advertisement

आज विमानाची सोय

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई-बेळगाव विमान रनवेवरून टेकऑफ होऊ शकले नाही. यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली. परंतु विमान कंपनीने बुधवारी सकाळी विमानाची सोय प्रवाशांना करून दिली आहे.

- त्यागराजन (विमानतळ संचालक, बेळगाव)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article