घरपट्टीवरील पाच टक्के सवलत मे महिन्यापर्यंत मिळणार
12:19 PM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मालमत्ता मालकांना सुविधा देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर पूर्ण भरणाऱ्या करदात्यांना पाच टक्के सवलत देण्याचा कालावधी 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. महानगरपालिकेकडून दरवर्षी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिल महिन्यात जे करदाते आपल्या मालमत्तेचा कर पूर्ण भरतात त्यांना पाच टक्के सवलत दिली जाते. त्यानंतर कर भरणाऱ्यांना सवलत दिली जात नाही. मात्र यंदा मे महिन्यातदेखील पूर्ण कर भरल्यास 5 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Advertisement
Advertisement