For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यातील पहिले पेपरलेस कोर्ट सांगलीत

04:37 PM Dec 24, 2024 IST | Radhika Patil
राज्यातील पहिले पेपरलेस कोर्ट सांगलीत
The first paperless court in the state is in Sangli.
Advertisement

सांगली : 

Advertisement

न्यायालयीन अभिलेख्यांचे संगणकीकरण करण्याचा पायलट प्रोजेक्ट राज्यात सांगली जिह्यात राबवला जात आहे. या माध्यमातून राज्यातील पहिल्या पेपरलेस कोर्टची संकल्पना साकार होणार आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप शर्मा यांनी सोमवारी येथे केले. जिल्हा व सत्र न्यायालय येथे जिह्यातील अभिलेख्यांचे संगणकीकरण (स्पॅनिंग अँड डिजीटायजेशन ऑफ रेकॉर्डस्) पायलट प्रकल्पाचा शुभारंभ शर्मा यांच्या हस्ते कागदपत्रांचे प्रतिनिधीक स्पॅनिंग करून झाला.

यावेळी जिल्हा न्यायाधीश वर्ग 2 पुरूषोत्तम जाधव, तदर्थ जिल्हा न्यायाधीश वर्ग 1 तथा जिल्हा प्रकल्प समन्वयक मधुरा काकडे, प्रभारी जिल्हा सरकारी वकील बाळासाहेब देशपांडे, बार असोसिएशनचे सचिव अमोल पाटील, विधी सेवा प्रा†धकरणचे सचिव जी. जी. कांबळे, श्रीमती बी. डी. कासार, मधुसुदन अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

न्यायालयीन अभिलेख्यांच्या संगणकीकरणास शुभेच्छा देऊन व अभिलेख्यांचे संगणकीकरण झाल्यामुळे पैसे, वेळ व जागेची बचत होणार असल्याचे सांगून प्रदीप शर्मा म्हणाले, प्रलां†बत प्रकरणांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल आहे. या संगणकीकरणासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सांगली जिह्यातील सर्व न्यायालयात यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे संगणकीकरणाचे काम एकाच वेळी त्या त्या ठिकाणी सुरू राहणार आहे. यासाठी संबधितांनी योग्य तो समन्वय ठेवावा. विहित कालमर्यादेत कंपनीने कागदपत्रांचे संगणकीकरण करून आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रास्ताविक जिल्हा प्रकल्प समन्वयक मधुरा काकडे यांनी केले. सूत्रसंचालन दिवाणी न्यायाधीश जी. जी. चौंडे यांनी केले. आभार दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. एस. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास न्यायालयातील अधिकारी, वकील व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.