For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियात मिळाला पहिला म्युटेंट बेडुक

06:38 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियात मिळाला पहिला म्युटेंट बेडुक
Advertisement

त्वचेचा रंग निळा, वैज्ञानिक थक्क

Advertisement

ऑस्ट्रेलियात एक अदभूत बेडुक मिळाला आहे. वृक्षांवर राहणारा हा बेडुक म्युटेंट आहे. विशेष बाब म्हणजेच याची त्वचा निळ्या रंगाची आहे. याला खास प्रकारचे जेनेटिक म्युटेशन कारणीभूत असून त्याला एक्सेनथिज्म म्हटले जाते. या म्युटेशनमध्ये पिवळ्या रंगाची कमतरता निर्माण होते, तर सर्वसाधारण हिरव्या रंगाच्या बेडकांमध्ये पिवळ्या रंगाचे पिगमेंट आढळून येतात. म्युटेंटचा अर्थ एखाद्या जीवाच्या गुणसुत्रात होणारा असा अचानक स्थायी बदल, ज्यामुळे तो स्वत:च्या प्रजातीतील अन्य जीवांपेक्षा वेगळा दिसुन येतो.

या बेडकाच्या डोक्यावर विचित्र हिरवा रंग आहे. या बेडकाचा निळा रंग त्याला जेनेटिक म्युटेशनमुळे प्राप्त झाला आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किंबरलेमध्ये असलेलया वाइल्डलाइफ सेंक्च्युरीमध्ये हा म्युटेंट बेडुक मिळाला. हा बेडुक स्वत: उडी घेत वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेत चाललेल्या वर्कशॉपमध्ये पोहोचला होता, तेथे त्याची त्वरित तपासणी सुरू करण्यात आली.

Advertisement

तपासणीत हा झाडावर राहणारा बेडुक असल्याचे समोर आले. या प्रकारच्या बेडकाला लिटोरिया स्पलेंडिडा म्हटले जाते. या सेंक्चुरीच्या कर्मचाऱ्यांनी याचे छायाचित्र काढून ते जेक बार्कर यांना पाठविले. जेक हे ऑस्ट्रेलियन वाइल्डलाइफ कंजरवेंसीमध्ये काम करतात. छायाचित्र पाहिल्यावर मी थक्कच झालो. निळ्या रंगाचा बेडुक मी पहिल्यांदाच पाहत होतो असे जेक यांनी म्हटले आहे.

सर्वसाधारणपणे झाडांवर राहणाऱ्या बेडकांचे शरीर हिरव्या रंगाचे असते. ज्यावर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. परंतु हा म्युटेंट बेडुक 4 इंचांपर्यंत वाढू शकतो. याच्या डोयावर हिरव्या रंगाचा हिस्सा दिसून येत असून विषाने भरलेली ग्रंथी म्हणजे ग्लँड आहे. हे विष अत्यंत तीव्र असते, याची शिकार करणाऱ्यांना ते त्रस्त करून सोडत असते.

हा म्युटेंट बेडुक कमाल 20 वर्षांपर्यंत जगू शकते. हा बेडुक कमी पाऊस असलेल्या भागातच आढळून येतो. विशेषकरून किंबरलेमध्येच. संशोधकांनी पहिल्याहंदाच निळ्या रंगाची त्वचा असलेला बेडुक पाहिला आहे. याच्या शरीरावर काही पांढरे ठिपके आहेत, तर याच्या पायांचा रंग पिवळा आहे. कुठलाही माणूस कधीच निळ्या रंगाचा बेडुक पाहण्याची अपेक्षा करू शकत नाही. हा बेडुक सुमारे 4.7 इंचाचा असल्याचे ऑस्ट्रेलियन म्युझियमच्या हरपेटोलॉजिस्ट जोडी रॉली यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.