कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

१११ ढोल, ३० ताशे असलेले पहिले 'महामेरू' पथक

12:56 PM Jul 17, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

 सांगली / सचिन ठाणेकर :

Advertisement

महामेरू ढोल पथकाची सुरुवात १५ जून २०१६ साली झाली. सर्वसामान्य मुलांना सर्वसमावेशक वाटून हा छंद जोपासला जावा, तसेच एक शिस्तप्रिय पथक, ज्यात आपल्या नावापेक्षा सदस्य पथकाला जास्त महत्व देऊन हे सदस्य काम करतील असं वातावरण बनवून एक नवीन उपक्रम करायचा या निर्णयातून पथकाची स्थापना संस्थापक अभिषेक पाटील यांनी केली.

Advertisement

पुण्यामध्ये या गोष्टीचं खूप आकर्षण आहे. त्यामुळे अभिषेक पाटील व त्यांची टीम दरवर्षी गणेशोत्सवात मिरवणूक पहायला जायचे. तिथून त्यांनाही ढोल वादनाची आवड निर्माण झाली, त्यांच्या तरुण मनाला ते भावलं आणि त्यांनी हे पथक बनवण्याचा निर्णय घेतला.

पहिले पथक प्रमुख व त्यांचं योगदान काय होतं?

सर्वात पहिला पथक ही संकल्पना अभिषेक पाटील यांच्या मनात आली. त्यांनी आधी एक वर्ष प्रशिक्षण घेतले असल्यामुळे त्यांनी हे सगळं इतर वादकांना समजावून सांगितलं आणि हे कसं घडवून आणता येईल. याचा आराखडा ही बनवला. तेव्हापासून अध्यक्ष म्हणून अभिषेक पाटील आजही कार्यरत आहेत. त्यांच्या या निर्णयाला सर्व मित्रांनी एकत्रित पाठिंबा दिला. पहिल्या टप्प्यात २२ सदस्यांसह पथक स्थापनेचा निर्णय घेण्यात आला.

अभिषेक हे स्थापनेपासून आजपर्यंत पडेल ती जबाबदारी ते नेटाने पार पाडत आहेत. पथकात व्यवस्थापन समिती असून ती सर्व कामे वाटून घेऊन पूर्ण करतात.

आजवर तशी कोणतीच अडचण आली नाही, पण प्रथम सर्वात मोठी अडचण ही चांगली जागा मिळण्यावरून आली. काही नागरिकांच्या तक्रारी असायच्या. त्यातून वेळोवेळी जागा बदलून त्यांना सहकार्य करायचं प्रयत्न केला. आपला छंद दुसऱ्याला त्रासाचा होऊ नये, अशी पथकाची भूमिका कायमच राहिलेली आहे.

पथकाचा सराव रोज चिंतामणराव कॉलेजच्या आवारात होतो. १६ वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांची निवड होते, जेणेकरून या प्रशिक्षणमध्ये जाणाऱ्या काळाचा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होणार नाही. त्यांना पहिल्या १५ दिवसात काही साधे ठेके शिकवले जातात. ते जमले तरच त्यांची निवड करूनपुढील प्रशिक्षण दिले जाते.

ही एक सांघिक गोष्ट असल्याने आपण कोणत्याही प्रकारे यात सहभागी होऊ शकतो. पण जेंव्हा वादन मोठे जास्त वेळ आणि महत्वाची असतील तर जेष्ठ वादक आपली भूमिका जास्त वेळ वादन करून ताशा आणि ढोलांचा समन्वय साधून पार पाडतात.

नाशिक ढोल व भजनी ठेका, हे पारंपरिक डाव आहेत. तसेच गोंधळ दांडिया, ताल काठियावाडी, असे नवीन ताल ही वाजवले जातात.

पथकाने तासगाव रथोत्सवात सलग तीन वर्षे मानाचे वादन केलेले आहे. तसेच विश्वहिंदू परिषदच्या चित्रदुर्ग येथील हिंदू महागणपतीसाठीही वादन केलेले आहे. सुमारे ४६० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गणपतीच्या मिरवणुकीला लाखोंची गर्दी होते. साल २०१७मध्ये १११ ढोल व ३० ताशे मिरवणुकीत लावणारे पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिले पथक आहे. २०१९ मध्ये पुण्यात रुद्रगर्जना या पथकास त्यांच्या मानाच्या मिरवणुकीत ५१ ध्वज सादरीकरणास या पथकाने मदत केली.

पथकात सर्वात जास्त सहभाग स्त्रियांचाच आहे. तरुणाचा सहभाग ही खूप आहे. सध्या फक्त जेष्ट पुरुष जे नियोजन बघू शकतील अशांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मुलीची संख्या अशीच जास्त वाढत राहिली तर मुलींचे स्वतंत्र पथक बनवायची आमची इच्छा आहे.

महामेरू पथकाने इतर कोणत्या जिल्ह्यात विस्तार केला नाही. पण २०१८ साली महामेरू ने San Diego अमेरिका येथे शाखा चालू केलेली होती. पण कोविडमध्ये काही मृत्यू व स्थलांतर झाल्यामुळे ती आता कार्यरत नाही. ती पुन्हा सुरू करायची इच्छा आहे.

चित्रदुर्ग येथील मिरवणूक व आता ३ वर्ष पूर्ण झालेल्या लोकराजा या मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होण्याचा पथकास फार अभिमान वाटतो.

मुलांना पांढरा कुर्ता व शेला आणि मुलींना लाल कोटसोबत लाल फेटा फारच उठावदार आणि आकर्षक दिसतो.

सदस्यांची माहिती आणि त्याचे कौतुक व्हावे याचसाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. यूट्यूबवर पथकाच्या एका व्हिडीओला सुमारे ४० लाख हून जास्त व्ह्यू आहेत.

आमच्या पथकातर्फे लोककला व सांस्कृतिक वाद्याचे संवर्धन केले जाते. जातीय व राजकीय वादापासून आमचे पथक लांब असते. तसेच आमचे पथक वृक्षारोपण, रक्तदान अशा सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असते, अशी माहिती पथकाचे अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article