For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘स्पिरिट’चा फर्स्ट लुक जारी

06:01 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘स्पिरिट’चा फर्स्ट लुक जारी
Advertisement

अॅनिमल’नंतर संदीप रेरेड्डी वांगा पुन्हा एकदा धमाल करण्याच्या तयारीत आहे. दिग्दर्शकाचा आगामी चित्रपट ‘स्पिरिट’चे चित्रिकरण यापूर्वीच सुरू झाले होते. आता चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी करण्यात आले आहे. या पोस्टरद्वारे चित्रपटातील मुख्य कलाकार प्रभास आणि तृप्ति डिमरी यांचा लुक उघड करण्यात आला आहे. ‘स्पिरिट’ हा चित्रपट चालू वर्षातील सर्वात चर्चेत राहणारा चित्रपट आहे. या चित्रपटातून दीपिका पदूकोनची एक्झिट आणि तृप्तिची एंट्री यापूर्वीच चर्चेचा विषय ठरली आहे.

Advertisement

अशास्थितीत प्रभाससोबत तृप्तिची जोडी पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. आता अखेर स्पिरिटमधील दोघांचा लुक उघड झाला आहे. या पोस्टरमध्ये प्रभासचा बॅकसाइड  लुक दिसून येत आहे, हातात दारू, तोंडात सिगारेट आणि पूर्ण शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. शर्टलेस प्रभासचे लांब केस दाखविण्यात आले आहेत, तर तृप्ति ही प्रभाससाठी लाइटर पेटवत असल्याचे दिसून येते.

Advertisement
Advertisement
Tags :

.