For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘राजारामबापू’चा पहिला हप्ता प्रतिटन 3200 रुपये

05:03 PM Dec 07, 2024 IST | Radhika Patil
‘राजारामबापू’चा पहिला हप्ता प्रतिटन 3200 रुपये
The first installment of 'Rajaram Bapu' is Rs. 3200 per ton.
Advertisement

इस्लामपूर : 
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुऊल व कारंदवाडी युनिटकडील 2024-25 हंगामातील ऊसास पहिला हप्ता  3200 ऊपये प्रतिटन देणार आहे. 2024-25 मधील अंतिम  दर अंदाजे 3275 रुपये अपेक्षित  असून उर्वरित रक्कम दिपावलीच्या सणास देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली. तसेच जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडील ऊस दराचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

ते पुढे म्हणाले, कारखाना व्यवस्थापनाने सन 2024-25 हंगामात साखराळे या†नटकडे 9 लाख 50 हजार मे. टन, वाटेगाव-सुरूल युनिटकडे 5 लाख मे. टन, कारंदवाडी या†नटकडे 4 लाख 50 हजार मेटन तसेच जत- तिप्पेहळ्ळी या†नटकडे 3 लाख असे एकूण 22 लाख मे. टन ऊस गाळपाचे उा†दष्ट ठेवले आहे. तरी सर्व ऊस उत्पादक व सभासद यांनी ा†पका†वलेला ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे.

पाटील पुढे म्हणाले, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस विकासाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. ठिबक सिंचन योजना, सच्छिद्र पाईप योजना, विविध खते, जविक खते कारखान्याच्या माध्यमातून शेतक्रयांना पुरविली जात आहे. कारखाना कार्यक्षेत्रात सहकारी पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून शेतीस पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच शेती उपयोगी वस्तू कमी दरात शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत.

Advertisement

आ. जयंत पाटील हे जलसंपदामंत्री असताना दुष्काळी भागास पाणी पुरवठा करणाऱ्या योजनाना गती दिल्याने दुष्काळी भागात पाणी उपलब्ध झाल्याने ऊसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. याप्रसंगी उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, प्रा†दपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहूली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, चिफ अकौंटंट संतोष खटावकर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.