कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वीडनमध्ये पहिला इलेक्ट्रिक रस्ता

06:27 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तंत्रज्ञानामुळे लोकांची कामे अत्यंत सोपी ठरली आहेत. तर एआयने जीवन सुलभ करून सोडले आहे. आता बाजारात नव्या इलेक्ट्रिक कार्स पोहोचल्या आहेत. इलेक्ट्रिक कारला एकदा चार्ज करत दीर्घ अंतर कापता येते. याचमुळे एका देशाने आता स्वत:च्या रस्त्याला देखील इलेक्ट्रिक केले आहे.

Advertisement

स्वीडन हा इलेक्ट्रिफाइड रोड असणारा पहिला देश ठरला आहे. या रोडचे वैशिष्ट्या म्हणजे यावरून धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना सहजपणे चार्ज करता येणार आहे. सुमारे 3 हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत रस्त्याला इलेक्ट्रिफाइड करण्याचे लक्ष्य स्वीडनने बाळगले आहे. येथे इलेक्ट्रिक वाहनांसाठी मजबूत इकोसिस्टीम तयार केली जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांना याचा मोठा लाभ होणार आहे, कारण ते या रस्त्यावर वाहन चालवून वाहनाला चार्ज करू शकतील. यासाठी संबंधित वाहनाला एक मूव्हेबल आर्म लावून घ्यावा लागणार आहे, याच्याच माध्यमातून वाहन चार्ज होणार आहे.

Advertisement

मूव्हेबल आर्म रस्त्यावर लावलेल्या पट्टीशी कनेक्ट होईल आणि यावरून जाणाऱ्या वाहनाची बॅटरी चार्ज करणार आहे. अशाप्रकारचा रस्ता निर्माण करण्यासाठी प्रति किलोमीटर 1.2 दशलक्ष डॉलर्स इतका खर्च येतो. या रस्त्याची खास बाब म्हणजे याच्या वरील हिस्स्यात वीजप्रवाह नाही, म्हणजेच यावरुन अनवाणी पायांनी चालताही येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article