महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अफगाण-न्यूझीलंड कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे खेळ वाया

06:23 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ग्रेटर नोयडा

Advertisement

न्यूझीलंड आणि अफगाण यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यातील सोमवारचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. वारंवार पावसामुळे मैदानावर बरेच पाणी साचले होते.

Advertisement

पंचांनी उपाहारानंतर मैदान आणि खेळपट्टीची दोनवेळा पाहणी केली. पण मैदान ओलसर असल्याने त्यांनी पहिल्या दिवशीचा खेळ होणार नसल्याचे जाहीर केले. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत दिल्ली आणि ग्रेटर नोयडा परिसरात सातत्याने मुसळधार पाऊस तसेच वादळी वारे वाहू लागले होते. अफगाण आणि न्यूझीलंड यांच्यातील ही पहिलीच कसोटी आहे. 2017 साली आयसीसीकडून अफगाणला कसोटी दर्जा मिळाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले आहेत. यापूर्वी बांगलादेश, लंका आणि आयर्लंड विरुद्धचे तिनी कसोटी सामने त्यांनी गमविले आहेत. न्यूझीलंड संघाची गेल्या मार्चनंतर ही पहिली कसोटी आहे. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची कसाटी मालिका ऑक्टोबर-नोव्हेबर दरम्यान होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article