For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लकरकोट-बांदा दत्त मंदिर कलशारोहण व प्राणप्रतिष्ठापनेचा प्रथम वर्धापन दिन उद्या

04:16 PM Apr 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
लकरकोट बांदा दत्त मंदिर कलशारोहण व प्राणप्रतिष्ठापनेचा प्रथम वर्धापन दिन उद्या
Advertisement

​त.भा. प्रतिनिधी
बांदा

Advertisement

बांदा लकरकोट येथील श्रीदत्त मंदिराचा कलशारोहण व प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा प्रथम वर्धापन दिन रविवार, दि. २६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.वर्धापन दिनानिमित्त सकाळी ७:०० वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. यामध्ये ​सकाळी ७:०० वा.: नित्यपूजा,​सकाळी ८:०० वा.: लघुरूद्र ,​सकाळी ९:०० वा.: दत्तयाग,​दुपारी १२:३० वा.: आरती व सामूहिक गाऱ्हाणे ​दुपारी १:०० वा.: महाप्रसाद, ​सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत सकाळी १०:०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे.सायंकाळी ५:०० वाजल्यापासून स्थानिक भजने होतील. रात्री ९:०० वाजता आरती झाल्यानंतर रात्री ९:३० वाजता 'दत्तप्रसाद कला, क्रीडा मंडळाचे' यशस्वी कलाकार 'उंबरठ्यावरी माप ठेविले' हे हृदयस्पर्शी तीन अंकी सामाजिक नाटक सादर करणार आहेत. ​तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहन 'दत्तप्रसाद कला-क्रीडा मंडळ, लकरकोट-बांदा'चे अध्यक्ष सुशांत पांगम व सर्व सदस्यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.