वित्त, बँक क्षेत्राचा निर्देशांक चमकला
06:22 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
वित्त संस्थांचे व बँकांचे समभाग सोमवारी शेअर बाजारात चांगले चमकले. वित्त कंपन्यांचे समभाग आठ टक्के वाढले. डिसेंबर तिमाहीमध्ये चांगल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर समभाग सकारात्मक तेजीसह कार्यरत राहिले होते. एयू स्मॉल फायनान्स बँक, सीएसबी बँक, आयडीबीआय बँक, मुथ्थुट फायनान्स व उज्जिवन स्मॉल फायनान्स बँक यांचे समभाग 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचले होते. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक समभागही उच्चांकावर पोहचले.
Advertisement
Advertisement