महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केकेआर-हैदराबाद यांच्यात रंगणार फायनल

06:58 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादचा राजस्थानवर 36 धावांनी विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव केला. या विजयासह हैदराबादने तिसऱ्यांदा आयपीएलची फायनल गाठली आहे. आता, रविवार दि. 26 रोजी केकेआर व हैदराबाद यांच्यात अंतिम सामना होईल. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 175 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 7 बाद 139 धावापर्यंत मजल मारता आली.  18 धावा व 23 धावांत 3 बळी घेणाऱ्या इम्पॅक्ट खेळाडू शाहबाज अहमदला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कोहलर 10 धावांवर बाद झाला. त्याने त्यासाठी 16 चेंडू खर्च केले. कर्णधार संजू सॅमसन व रियान पराग हे स्टार फलंदाज सपशेल अपयशी ठरले. सॅमसनने 11 चेंडूत 10 धावा केल्या. तर रियान परागचा (6 धावा) अडथळला  शाहबाज अहमदने दूर केला. एका बाजूला विकेट पडत असताना यशस्वी जैस्वालने मात्र 21 चेंडूत 42 धावांची खेळी केली. त्याने आपल्या वादळी खेळीत तीन षटकार आणि चार चौकार ठोकले. फटकेबाजीच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर ध्रुव जुरेलने एकाकी झुंज दिली. जुरेलने 35 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षटकार आणि सात चौकार ठोकले. त्याला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळाली नाही, त्यामुळे राजस्थानचा पराभव झाला. राजस्थानला 20 षटकांत 7 बाद 139 धावापर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून शाहबाज अहमदने 3 तर अभिषेक शर्माने 2 गडी बाद केले.

हैदराबाद तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात धोकादायक अभिषेक शर्माला बाद केले. बोल्टने हैदराबादच्या पहिल्या तीन फलंदाजांना पॉवरप्लेमध्येच तंबूत धाडले.  अभिषेक शर्मा 12, एडन मार्करम 1 आणि राहुल त्रिपाठी 37 धावांवर बाद झाले. एका बाजूला विकेट पडत असताना ट्रेविस हेड शांततेत फलंदाजी करत होता. अभिषेक शर्माने 5 चेंडूत एक चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने 12 धावा केल्या. राहुल त्रिपाठीने छोटी पण आक्रमक खेळी केली. त्रिपाठीने 15 चेंडूमध्ये  37 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्रिपाठीने दोन षटकार आणि पाच चौकार ठोकले. क्वालिफायर सामन्यात संधी मिळालेल्या मार्करमला प्रभावी कामगिरी करता आली नाही. मार्करम फक्त एका धावेवर बाद झाला. ट्रेविस हेडने 28 चेंडूमध्ये संथ 34 धावांची खेळी केली.

ठराविक अंतराने विकेट पडत असतानाही हेन्रिक क्लासेनने आपले काम चोख बजावले. क्लासेनने 34 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. क्लासेनच्या शानदार अर्धशतकी खेळीमुळेच हैदराबादचा संघ सन्मानजनक धावसंख्या उभारु शकला. क्लासेनने आपल्या खेळीमध्ये चार षटकार ठोकले. संदीप शर्माने क्लासेनला तंबूचा रस्ता दाखवला. नितीशकुमार रे•ाrला फक्त पाच धावा करता आल्या. अब्दुल समदला खातेही उघडता आले नाही. अखेरीस शाहबाज अहमद आणि पॅट कमिन्स यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. शाहबाद अहमदने 18 चेंडूत एका षटकारासह 18 धावा केल्या. तर पॅट कमिन्स 5 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादने 20 षटकांत 9 गडी गमावत 175 धावा केल्या. राजस्थानकडून आवेश खान व ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. संदीप शर्माने 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक :

सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 9 बाद 175 (ट्रेव्हिस हेड 34, राहुल त्रिपाठी 37, हेन्रिक क्लासेन 34 चेंडूत 50, शाहबाज अहमद 18, आवेश खान व ट्रेंट बोल्ट प्रत्येकी तीन बळी, संदीप शर्मा 2 बळी).

राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 7 बाद 139 (यशस्वी जैस्वाल 42, कोहलर 10, संजू सॅमसन 10, ध्रुव जुरेल नाबाद 56, शाहबाज अहमद 3 तर अभिषेक शर्मा 2 बळी, पॅट कमिन्स व नटराजन प्रत्येकी 1 बळी).

ट्रेंट बोल्टचे पॉवरप्लेमध्ये बळींचे शतक

हैदराबादविरुद्ध सामन्यात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने शानदार कामगिरी करताना पॉवरप्लेमध्ये तीन बळी घेण्याची किमया केली. यासह बोल्टने टी-20 क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने 223 सामन्यात आपले बळींचे शतक पूर्ण केले आहे. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली अव्वल स्थानावर आहे. डेव्हिड विलीने त्याच्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत 292 सामने खेळत 295 बळी घेतले आहेत. त्यापैकी 128 बळी पॉवरप्ले ओव्हर्समध्ये आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भारताचा भुवनेश्वर कुमार आहे. भुवीने आपल्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत 284 सामन्यांत 299 बळी घेतले आहेत. यापैकी त्यानं 118 विकेट पहिल्या 6 षटकांतच घेतल्या आहेत. बोल्ट या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article