वर्षातील अंतिम सत्र घसरणीसह बंद
सेन्सेक्स 170 तर निफ्टी 47.30 अंकांनी नुकसानीत : गुंतवणूकदारांची सावध भूमिका
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू वर्ष 2023 च्या अंतिम सत्राचा प्रवास हा शुक्रवारी घसरणीसह बंद झाला आहे. यावेळी गुंतवणूकदारांनी आपली सावध भूमिका घेतल्याने बाजारात तेजीचा मोहोल काहीसा कमी राहिल्याचे दिसून आले. मात्र जागतिक शेअर बाजारांमध्ये सकारात्मक कल दिसून आला होता.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 170.12 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 72,240.26 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 47.30 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 21,731.40 वर बंद झाला आहे.
बाजारात शुक्रवारी निफ्टीमिड कॅप 100 , बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकात तेजीत राहिले. तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक यांचे निर्देशांक मात्र प्रभावीत होत बंद झाले. तेजी प्राप्त केलेल्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने टाटा कंझ्युमर, टाटा मोर्ट्स, बजाज ऑटो आणि आयशर मोर्ट्स यांच्या समभागांचा समावेश राहिला आहे. तर अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये बीपीसीएल, ओएनजीसी, स्टेट बँक आणि कोल इंडिया यांचे समभाग राहिले आहेत.
नव वर्षाची चाहूल
भारतीय शेअर बाजाराला आता नववर्षाची चाहूल लागून राहिली आहे. कारण वर्ष 2024 चा प्रारंभ हा नवीन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सोमवारी होणार आहे. यामुळे या वर्षात भारतासह प्रमुख देशांमध्ये निवडणूका होणार आहेत. एका बाजूला काही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती आहे. तर कच्चे तेल व आंतरराष्ट्रीय बाजारातील महागाई दर आदी विषयांचा उलगडा करतच शेअर बाजाराला नव वर्षाला वेलकम म्हणावे लागणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांनाही आपली गुंतवणुकीची नवीन योजना आखत वर्षभराचा प्रवास निश्चित करावा लागणार असल्याचे काही अभ्यासकांनी म्हटले आहे.
जागतिक घडामोडींचा प्रभाव
आशियातील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की नुकसनीत राहिला आहे. तर चीनमधील शांघाय कम्पोजिट आणि हाँगकाँगचे निर्देशांक लाभात राहिले आहेत. दक्षिण कोरियाचा बाजारात बंद राहिला होता. युरोपीयन बाजारात तेजीसह बंद झाला आहे. गुरुवारी मात्र एमरिकन बाजारात मिळता जुळता कल राहिला होता.
कच्चे तेल वधारले
जागतिक तेल मानक ब्रेंड क्रूड 0.86 टक्क्यांनी वधारुन 77.81 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलच्या भावावर राहिला होता.