For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठवड्यातील अंतिम सत्र प्रभावीत

06:55 AM May 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
आठवड्यातील अंतिम सत्र प्रभावीत
Advertisement

धातू क्षेत्र नुकसानीत : सेन्सेक्स 182 अंकांनी नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवड्यातील शेवटच्या दिवशी आशियाई बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी घसरणीत राहिले आहेत. यामध्ये आयटी आणि धातू क्षेत्रातील समभाग नुकसानीत राहिले आहेत. अमेरिकेच्या अपील न्यायालयाने गुरुवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले सर्वात मोठे टॅरिफवर फटकार लगावली आहे. यामुळे आयटी समभागांमध्ये घसरण झाली.

Advertisement

बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी 81,465.69 अंकांच्या खाली उघडला. ट्रेडिंग दरम्यान तो बहुतेक वेळा घसरणीतच राहिला आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 182.01 अंकांनी घसरून 81,451.01 वर बंद झाला. याप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82.90 अंकांनी घसरून 24,750.70 वर बंद झाला.

बाजारातील चढ-उतारांमध्ये गुंतवणूकदार सावध दृष्टिकोन घेत आहेत. गुंतवणूकदार मार्च 2025 तिमाहीसाठी कॉर्पोरेट कमाईचे विश्लेषण करत आहेत.  याशिवाय, गुंतवणूकदारांचे लक्ष ट्रम्पच्या टॅरिफशी संबंधित नवीनतम जागतिक व्यापार घडामोडींवर देखील आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे खासगी कंपन्यांकडून सावध गुंतवणूक असूनही, ग्रामीण मागणीत वाढ आणि सरकारी खर्चात वाढ झाल्यामुळे जानेवारी-मार्च तिमाहीत देशाच्या आर्थिक वाढीला वेग येण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन अपील न्यायालयाने म्हटले आहे की, ते कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत आहेत आणि लवकरच सरकारच्या अपीलावर विचार करतील. दोन्ही पक्षांना उत्तर देण्यासाठी तारखा देण्यात आल्या आहेत. कनिष्ठ न्यायालयाने म्हटले आहे की संविधानानुसार, कर लादण्याचा अधिकार फक्त काँग्रेसला आहे, राष्ट्रपतींना नाही. ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याचा हवाला दिला, जो राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लागू होतो.

शुक्रवारी आशियाई बाजार घसरले. अमेरिकेची मंदावलेली अर्थव्यवस्था, चलनवाढीची भीती दिसते आहे.

Advertisement
Tags :

.