एमिली इन पॅरिसचा अंतिम सीझन येणार
फेयरवेल सीझनचे चित्रिकरण सुरू
एमिली इन पॅरिस या सीरिजने स्वत:च्या 6 व्या आणि अंतिम सीझनची घोषणा केली आहे. आगामी सीझन शो अखेरचा असेल अशी घोषणा निर्मात्यांनी एका पोस्टद्वारे केली आहे. या सहाव्या सीझनचे चित्रिकरण सुरू झाले असून निर्मात्यांनी ग्रीसमधून काही छायाचित्रेही शेअर केली आहेत. यात अनेक कलाकार सुंदर सेटवर पोहोचलेले दिसून आले.
लिली कॉलिन्स या सीरिजमध्ये एमिलीची भूमिका साकारत असून ती शिकागोतील एक मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह आहे. तिला पॅरिसमध्ये अचानक मनाजोगी नोकरी मिळते आणि ती युरोपच्या अशा यात्रेत निघते, जी तिचे आयुष्यच बदलून टाकते. याचदरम्यान काम, मैत्री आणि रोमान्स सांभाळत तिचे नवे आयुष्य रोमांचक अनुभव आणि चकित करणाऱ्या आव्हानांनी भरून जाते.
सीझन 6 मध्ये तुम्हाला ते सर्व काही मिळेल, जे तुम्हाला पसंत आहे आणि हा एमिलीच्या जीवनभराचा अंतिम अध्याय असेल. आमचे सर्व कलाकार आणि सदस्य या फेयरवेल सीझनला आकर्षक करण्यासाठी जीवतोड मेहनत करत आहेत असे लिलीने म्हटले आहे. हा सहावा सीझन चालू वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.