For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेन-इंग्लंडदरम्यान आज ‘युरो’ची अंतिम लढत

06:49 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पेन इंग्लंडदरम्यान आज ‘युरो’ची अंतिम लढत
Advertisement

वृत्तसंस्था/ बर्लिन

Advertisement

युरो स्पर्धेची अंतिम फेरी आज रविवारी रंगणार असून त्यात इंग्लंड आणि स्पेन यांच्यात सामना रंगणार आहे. एकीकडे एक किशोरवयीन वंडरकीड, उत्कृष्ट मध्यफळी यांच्या जोरावर यशाच्या नवीन युगाच्या उंबरठ्यावर असलेला स्पर्धेतील एक सर्वोत्तम संघ आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडता पडता वाचलेला, लवचिकता असलेला आणि वारंवार टीका होणारा प्रशिक्षक पदरी असलेला संघ यांच्यात हा सामना होणार आहे.

स्पेनचा स्टार बनलेला लॅमिने यामाल हा त्याच्या 17 व्या वाढदिवसाच्या एका दिवसानंतर या सामन्यात उतरणार असून 2008 ते 12 या कालखंडानंतर स्पेनला पुऊषांच्या फुटबॉल खेळातील पहिला मोठा चषक प्राप्त करून देण्याचा तो निश्चितच प्रयत्न करेल. 2010 मधील विश्वचषकाबरोबर त्याच्या आधी व नंतर झालेल्या युरो स्पर्धा त्यांनी लागोपाठ जिंकल्या होत्या.

Advertisement

यामालच्या नेत्रदीपक फटक्यानेच स्पेनला उपांत्य फेरीत फ्रान्सवर 2-1 असा विजय मिळवून दिला होता. यमालला सहकारी विंगर निको विल्यम्सची साथ मिळणार आहे. मात्र मधली फळी ही स्पेनची खरी ताकद असून त्यात रोद्री, फॅबियन ऊईझ, डॅनी ओल्मो यांचा समावेश असून त्यांचा सामना करणे इंग्लंडला सोपे जाणार नाही. गतविजेता इटली आणि क्रोएशिया यांचा समावेश असलेल्या गटात स्पेन अव्वल स्थानावर राहिला. त्यानंतर त्यांनी यजमान देश जर्मनी आणि फ्रान्सचे आव्हान संपुष्टात आणले. त्यांनी सलग सहा विजय मिळविलेले आहेत.

पुरुषांच्या फुटबॉल खेळातील मोठ्या विजेतेपदासाठी दीर्घकाळापासून चाललेली प्रतीक्षाा संपवण्याची इंग्लंडला ही आणखी एक संधी आहे. स्पेनने इंग्लंडला कमी लेखण्याची चूक करून चालणार नाही. मागील 20 वर्षांतील इंग्लंडच्या या सर्वांत प्रतिभावान संघाने अपेक्षेनुरुप कामगिरी केलेली नसून संघ असंतुलित दिसत आहे तसेच कल्पनांची कमतरता आणि काही बाबतीत थकवाही जाणवत आहे. परंतु असे असले, तरी सलग दुसऱ्यांदा त्यांनी युरोपियन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांच्याकडे ज्युड बेलिंगहॅम, फिल फोडेन, बुकायो साका आणि केन असे मॅचविनर्स आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Advertisement
Tags :

.