खासगी आरक्षणावर पुढील मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय घेणार
11:06 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना आरक्षण देण्यासंबंधी मागील मंत्रिमंडळ बैठकीत अर्धवट चर्चा झाली होती. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहे. विधानसभेत गुरुवारी खासगी क्षेत्रातील आरक्षणासंबंधीचा मुद्दा विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाचा मुद्दा अर्धवट राहिला. पूर्णपणे निष्कर्ष काढण्यात आला नाही. दरम्यान, वृत्तपत्रांमध्ये वृत्त झळकले. संभ्रम दूर करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल,असे सिद्धरामय्या म्हणाले.
Advertisement
Advertisement