‘टेल मी सॉफ्टली’ चित्रपट येणार ओटीटीवर
हॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘टेल मी सॉफ्टली’ लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. हा एक स्पॅनिश चित्रपट असून त्याची धाटणी रोमँटिक ड्रामा स्वरुपाची आहे. प्रसिद्ध लेखक मर्सिडीज रॉन यांची लोकप्रिय बुक सीरिज टेल मी ट्रायलॉजीच्या पहिल्या भागावर हा चित्रपट असून यात प्रेमाच्या त्रिकोणाची कहाणी दाखविण्यात आली. चित्रपटाची कहाणी एका युवतीच्या अवतीभवती फिरणारी असून तिच्या जीवनात एक्स परतल्यावर खरा रोमांच सुरू होतो. टेल मी सॉफ्टली हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 12 डिसेंबरपासून पाहता येणार आहे. हा चित्रपट इंग्रजी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. टेल मी सॉफ्टली या चित्रपटात फर्नांडो लिंडेज, डिएगो विडाल्स आणि एलिसा फाल्को हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहेत. हा चित्रपट थेट ओटीटीवर पाहता येईल. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या रोमँटिक थ्रिलरपट पाहण्याची इच्छा असलेल्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मोठी पर्वणी ठरणार आहे.