For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढा सातत्याने तेवत ठेवू!

10:08 AM Nov 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढा सातत्याने तेवत ठेवू
Advertisement

खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने जिद्दीने प्रयत्न करण्याची मागणी

Advertisement

खानापूर : सीमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत हा लढा सातत्याने तेवत ठेवणे आमचे आद्यकर्तव्य आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती संपवण्याचा घाट कर्नाटक सरकार करत आहेत. लढ्याची परंपरा आणि इतिहास साक्षी आहेत. महाराष्ट्र सरकारने दिल्ली दरबारी हा प्रश्न प्रखरतेने मांडून आमची कर्नाटकाच्या जोखडातून मुक्तता करावी, असे वक्तव्य खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले. खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने 1 नोव्हेंबर काळा दिन पाळण्यात आला. येथील शिवस्मारकातील माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात सकाळी 10 ते 2 लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यानंतर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. प्रास्ताविक आबासाहेब दळवी यांनी केले. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, आज तालुक्याचे नेतृत्व राष्ट्रीय पक्षाकडे असल्याने कन्नडिगांना उधाण आले आहे. आम्ही महाराष्ट्रात जाण्यासाठी जे जे करता येईल ते करत आहोत. यापुढील काळात समितीच्या माध्यमातून सीमाप्रश्न सोडवून घेण्यासाठी पाठपुरावा कऊया. यावेळी विलास बेळगावकर म्हणाले, सीमाप्रश्नाचा लढा गेली 67 वर्षे आम्ही न्यायमार्गाने लढत आहोत. मात्र केंद्राने आम्हाला न्याय दिला नाही. कर्नाटक सरकार मराठी भाषा आणि संस्कृती संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी  सीमाचळवळ नेटाने नेणे गरजेचे आहे.

राजाराम देसाई म्हणाले, मराठी भाषिकांत आजही सीमाप्रश्नाबद्दल तळमळ आहे. आणि 65 वर्षाच्या कर्नाटकी जुलुमाला थोपवण्यासाठी तऊण शक्ती पुढे येणे गरजेचे आहे. निरंजन देसाई म्हणाले, कर्नाटक सरकार आमच्यावर सातत्याने अन्याय करत आहे. या अन्यायाच्या विरोधात गेल्या तीन पिढ्या आम्ही सातत्याने संघर्ष करत आहोत. आम्हाला न्याय मिळालेला नाही. मात्र आम्ही या अन्यायाच्या विरोधात खचून न जाता सीमाप्रश्नाचा लढा पुन्हा तीव्र करुया, आणि सीमाप्रश्न सोडवून घेईपर्यंत सातत्याने संघर्ष करुया. शंकर गावडा म्हणाले, 1 नोव्हेंबर आमच्यासाठी काळा दिवस आहे. गेल्या 65 वर्षात आम्ही कर्नाटक सरकारच्या विरोधात आजही त्याच आवेशाने लढत आहोत.येत्या काळात तालुक्यात समितीबाबत जागृती करून सीमाप्रश्न चळवळ तीव्र कऊया. यावेळी माऊती परमेकर म्हणाले, लढ्याचा 65 वर्षांचा इतिहास आहे. आज महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न न्यायालयात दाखल केल्याने न्यायप्रविष्ट असला तरी आम्हाला रस्त्यावरची लढाई दिलीच पाहिजे. तसेच महाराष्ट्राने दिल्ली दरबारी हा प्रश्न उपस्थित करून सीमाप्रश्न सोडवून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुरलीधर पाटील म्हणाले, सीमाप्रश्नासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आम्ही यासाठी महाराष्ट्रातील खासदारांच्या माध्यमातून प्रयत्न केले होते. मात्र याला यश आले नाही. पुन्हा दिल्ली दरबारी सीमाप्रश्न सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करुया. जगन्नाथ बिरजे, अनिल पाटील यांनीही विचार मांडले.

Advertisement

सीमासत्याग्रहींची तळमळ

यावेळी सीमासत्याग्रही शंकर पाटील, पुंडलिक चव्हाण हे 1 नोव्हेंबर काळ्यादिनी उपोषणात सहभागी झाले होते. त्यांची महाराष्ट्रात जाण्याची तळमळ आजही त्याच आवेशात असून ते आपले म्हणणे मांडताना म्हणाले, मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1956 पासून आम्ही सीमासत्याग्रहात सातत्याने भाग घेत आहे. शिक्षा भोगली आहे. तरीही आमच्यातील सीमाप्रश्नाबद्दलची तळमळ तसूभरही कमी झाली नाही. जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही लढतच राहू. यावेळी जयराम देसाई, रमेश धबाले, प्रकाश चव्हाण, वसंत नावलकर, लक्ष्मण पाटील, विठ्ठल गुरव, मऱ्याप्पा पाटील, संजय पाटील, मल्हारी खांबले, गोपाळ हेब्बाळकर, मुकूंद पाटील, हेमंत घाडी, सुनिल पाटील, मारुती दे. गुरव, रणजित पाटील, कृष्णा मन्नोळकर, अमृत शेलार, रविंद्र शिंदे, अर्जुन सिद्धाणी, प्रवीण पाटील, अनिल पाटील, ऊक्माण्णा झुंजवाडकर, रमेश देसाई, महादेव घाडी, अमृत पाटील, मधुकर पाटील, यशवंत पाटील, डी. एम. गुरव व कार्यकर्ते उपस्थित होते.

सभेवेळी डीजे लावून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न

कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी येथील शिवस्मारकात म. ए. समितीच्यावतीने सकाळी 10 पासून लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. यानंतर दुपारी 3 वाजता सभा घेण्यात आली. बाहेरुन आलेल्या कानडिगांनी राज्योत्सवाची मिरवणूक डिजेचे सर्व नियम धाब्यावर बसून आवाज पूर्ण क्षमतेने लावून येथील शिवस्मारक चौकात धिंगाणा घालत मिरवणूक काढण्यात आली होती. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच राजा छत्रपती चौकात सभामंडप करून कर्कश आवाजात डिजे लावला होता. सभेत जाणीवपूर्वक व्यत्यय आणण्यासाठी डिजे लावला होता. मात्र समिती कार्यकर्त्यांनी डिजेच्या आवाजाला दाद न देता निषेध सभा पार पाडली. निषेध सभा संपताच डिजे बंद करण्यात आला.

Advertisement
Tags :

.