For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मैदान गाजवलं! अंत्रोळी प्रीमियर लीगमध्ये गोलंदाजी अन् फलंदाजीची आतिषबाजी; विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

05:38 PM Apr 09, 2026 IST | NEETA POTDAR
मैदान गाजवलं  अंत्रोळी प्रीमियर लीगमध्ये गोलंदाजी अन् फलंदाजीची आतिषबाजी  विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
Advertisement

                        अंत्रोळी प्रीमियर लीग  टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

Advertisement

अंत्रोळी - (समीर शेख ) जय हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त येथील अंत्रोळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंत्रोळी प्रीमियर लीग (APL) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवारी (दि. ८ एप्रिल) मोठ्या उत्साहात पार पडले. पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षण ठरलेली ही स्पर्धा यंदाही जल्लोषात संपन्न झाली.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. २०,५५५ (उद्योगपती गणेश कोळी), द्वितीय पारितोषिक रु. १५,५५५ (विनय आपटे), तृतीय पारितोषिक रु. ११,५५५ (विलास भालगावकर) व चतुर्थ पारितोषिक रु. ५,५५५ (रमेश (अण्णा) आसबे) यांच्याकडून ठेवण्यात आले होते. विजेत्या संघांना गणपत कुंभार यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तर इतर बक्षिसे क्रिकेटर क्लब, ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमींकडून देण्यात आली. या स्पर्धेत पंचक्रोशीतील २५ संघांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये हरळवाडी क्रिकेट क्लब (हराळवाडी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रभात क्रिकेट क्लब (अंत्रोळी) द्वितीय, G.A. क्रिकेट क्लब (अंत्रोळी) तृतीय, तर जगदंबा क्रिकेट क्लब (देगाव) यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला.

Advertisement

बक्षीस वितरण कार्यक्रमास उद्योगपती गणेश कोळी, विलास भालगावकर, रमेश (अण्णा) आसबे, पोलीस उपनिरीक्षक रवी चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशपाक मियॉवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी अंत्रोळी व परिसरातील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जितेंद्र थोरात, सर्जेराव शिंदे, बिरू शिंदे, अशोक हजारे, डॉ. विलास भालगावकर, राम कोळी, सिद्धू माने यांचे सहकार्य लाभले. तसेच दादा शिंदे, आप्पू कोळी, श्रीकांत कोकरे, सागर थोरात, बिरू कर्वे, विशाल बंडगर, प्रशांत सलगरे, फिरोज शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :

.