महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाने बाजारात उत्साह

07:00 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयटी व बँकिंग क्षेत्रातील समभाग मजबूत : सेन्सेक्सची 900 अंकांवर उसळी

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह या अमेरिकेच्या केंद्रीय बँकेची गुरुवारी बैठक झाली असून मागील काही दिवसांपासून व्याजदर वाढी संदर्भात जी चर्चा सुरु होती, त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे. अमेरिकन फेडरलने व्याजदरात कोणतीही वाढ न करता व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने याचा सकारात्मक परिणाम हा भारतीय बाजारात गुरुवारी पाहायला मिळाला. फेडरलने आपल्या व्याजदरासंदर्भात सादर केलेल्या निर्णयाचे भारतीय बाजाराने जोरदार स्वागत केले आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 929.60 अंकांनी वधारुन निर्देशांक 70,514.20 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 256.35 अंकांच्या कामगिरीने मजबूत होत निर्देशांक 21,182.70 वर बंद झाला.

गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 23 समभाग हे वधारुन बंद झाले. यामध्ये टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक आणि इंडसइंड बँक हे तेजीत अव्वल स्थानी राहिले. यामध्ये टेक महिंद्राचे समभाग हे सर्वाधिक 3.91 टक्क्यांनी मजबूत राहिल्याचे दिसून आले. शेअर बाजारात तेजीमध्ये निफ्टीमधील मिडकॅप 100, बीएसई स्मॉलकॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक यांचे निर्देशांक वधारले आहेत. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये सात कंपन्या नुकसानीत राहिल्या आहेत. यासह पॉवरग्रिड कॉर्प, नेस्ले इंडिया, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील आणि मारुती सुझुकी यांचे समभाग हे प्रभावीत राहिले असून यामध्ये पॉवरग्रिडचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 2.01 टक्क्यांनी घसरले आहेत.

तेजीचा कल कायम राहणार?

भारतीय बाजारातील कामगिरी गुरुवारी मजबूत राहिली असून आता आगामी सप्ताहातही तेजीचा माहोल कायम राहणार का की अन्य काही कारणास्तव बाजारात घसरणीचा कल राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article